Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराची बैठक अचानक रद्द; मोदी रात्रीच शहांना भेटले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 11:17 AM2021-07-06T11:17:09+5:302021-07-06T11:18:22+5:30

Cabinet Expansion buzz: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) निवासस्थानी आज सायंकाळी मोठ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, जे पी नड्डा, राजनाथ सिंह, निर्मला सितारामन, धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, प्रह्लाद जोशी आणि नरेंद्र सिंह तोमर हे उपस्थित राहणार होते.

Cabinet Expansion buzz: PM Narendra Modi's Meet With Ministers Today Cancelled | Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराची बैठक अचानक रद्द; मोदी रात्रीच शहांना भेटले

Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराची बैठक अचानक रद्द; मोदी रात्रीच शहांना भेटले

googlenewsNext

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी आज सायंकाळी आयोजित केलेली बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. उद्या किंवा गुरुवारी मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आले होते. मात्र, आजची बैठक रद्द झाल्याने आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी पुन्हा वेळ लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (PM Modi’s meeting with Amit Shah, JP Nadda, top ministers Rajnath Singh and others on Tuesday evening on the likely plans of Cabinet expansion has been cancelled .)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) निवासस्थानी आज सायंकाळी मोठ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, जे पी नड्डा, राजनाथ सिंह, निर्मला सितारामन, धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, प्रह्लाद जोशी आणि नरेंद्र सिंह तोमर हे उपस्थित राहणार होते. परंतू मोदी यांनी काल रात्रीच गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे सचिव बी एल संतोष यांची भेट घेतली. यानंतर हा आजची बैठक रद्द करण्याच निर्णय घेण्यात आला आहे. 

मोदींच्या मंत्रिमंडळाचा हा विस्तार याच आठवड्यात किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. हा विस्तार ७ किंवा ८ जुलैला होईल. चांगले काम न करणाऱ्या मंत्र्यांना हटविले जाणार आहे. तर नव्या दमाचे जवळपास २२ नेत्यांना या विस्तारात संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. 
याचबरोबर काही मंत्र्यांची खाती बदलली जाण्याची शक्यता आहे. मोदी सरकार-२ ला दोन वर्षे होऊन गेली आहेत. यामुळे आगामी पाच राज्यांतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या त्या समाजाचे नेते, राजकीय समीकरण दिसण्याची शक्यता आहे. 

नारायण राणे दिल्लीत...
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. शिवसेनेनं भाजपचा हात सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केला. यासाठी शिवसेनेनं केंद्रातील मंत्रिपदावर पाणी सोडलं. शिवसेनेनंतर शिरोमणी अकाली दलानंदेखील भाजपची साथ सोडली. त्यामुळे दोन मंत्रिपदं रिक्त झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला असलेलं मंत्रिपद कोणाकडे जाणार याची उत्सुकता आहे. या पदासाठी राज्यसभेचे खासदार नारायण राणेंची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
नारायण राणेंना दिल्लीहून तातडीचं बोलावणं आल्याची माहिती एबीपी माझा वृत्तवाहिनीनं दिली आहे. त्यामुळे राणे उद्याच दिल्लीला रवाना होतील. ते दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेला सातत्यानं अंगावर घेण्याचं काम राणेंनी केलं आहे. त्याच कामाची पावती म्हणून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 
 

Web Title: Cabinet Expansion buzz: PM Narendra Modi's Meet With Ministers Today Cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.