केंद्र सरकार लुटारू आणि खोटारडे- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 05:04 AM2019-04-25T05:04:56+5:302019-04-25T05:05:28+5:30

कसाऱ्यातील जाहीर सभेत टीका

Central Government Lootaru and Khotarde - Prakash Ambedkar | केंद्र सरकार लुटारू आणि खोटारडे- प्रकाश आंबेडकर

केंद्र सरकार लुटारू आणि खोटारडे- प्रकाश आंबेडकर

Next

कसारा : काळे पैसेवाल्यांना लुटण्यासाठी नोटा बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, हे सरकार लुटारू व खोटारडे असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी कसारा येथील जाहीर सभेत केला.

शहापूर तालुक्यातून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो; परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे येथे कायम पाणीटंचाई असते. त्यामुळे येथे सिंचन योजना राबवता येत नाहीत. येथील लोकप्रतिनिधींमध्ये इच्छाशक्ती नसल्याने येथील जमीन ओसाड पडली आहे. ग्रामीण भागाची भौगोलिक परिस्थिती पाहता, येथे कृषीवर आधारित व्यवसाय सुरू करून येथील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करण्याची गरज आहे. या भागात दुग्धसंकलन केंद्र व भाजीपाला व्यवसाय सुरू केल्यास येथे मोठी बाजारपेठ निर्माण होऊन जोडव्यवसाय आणि रोजगारनिर्मिती होऊ शकते; पण शासन त्यानुसार योजनाच राबवत नसल्याने येथील लोक शहराकडे रोजगारासाठी जात असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. सभेला भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रदीप वाढविंदे, कसारा शहराध्यक्ष अमीर भरीत, प्रकाश घेगडे व एमआयएमचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आजी, माजी खासदार धनदांडग्यांचे
भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार कपिल पाटील व माजी खासदार सुरेश टावरे यांच्यावर टीका करताना, काँग्रेसच्या राजवटीत खासदार टावरे यांनी फक्त स्वत:चा विकास केला. गोरगरीब, शेतकरीवर्गासाठी काहीही केले नसल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. सुरेश टावरे यांना जाणीव असती, तर त्यांनी किमान एखादा दुग्ध प्रकल्प या भागात उभारला असता. त्यामुळे उत्तर प्रदेश, गुजरातहून महाराष्ट्राला होणारा दूधपुरवठा बंद झाला असता आणि येथील शेतकरी समृद्ध झाले असते, असे आंबेडकर या वेळी म्हणाले.

Web Title: Central Government Lootaru and Khotarde - Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.