गांधीनगरचा गड भेदण्याचे कॉँग्रेसपुढे तगडे आव्हान, तीन दशकांपासून जागा भाजपकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 04:10 AM2019-04-14T04:10:27+5:302019-04-14T04:11:07+5:30

गेल्या तीन दशकांपासून गांधीनगरची जागा ही भाजपच्या ताब्यात आहे.

The challenge for the Congress to defeat Gandhinagar, the BJP has been in the forefront for three decades | गांधीनगरचा गड भेदण्याचे कॉँग्रेसपुढे तगडे आव्हान, तीन दशकांपासून जागा भाजपकडे

गांधीनगरचा गड भेदण्याचे कॉँग्रेसपुढे तगडे आव्हान, तीन दशकांपासून जागा भाजपकडे

Next

गांधीनगर : गेल्या तीन दशकांपासून गांधीनगरची जागा ही भाजपच्या ताब्यात आहे. भाजपने यावेळी येथून राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी दिली आहे. कॉँग्रेसने येथून दोन वेळा आमदार असलेले सी.जे. चावडा यांना मैदानात उतरविले आहे. भाजपचा हा अभेद्य गड भेदण्याचे कॉँग्रेसपुढे आव्हान आहे. यापूर्वी नामांकित उमेदवार देऊनही कॉँग्रेसला येथून यश मिळालेले नाही.
सहा वेळा सलगपणे गांधीनगरची जागा जिंकणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याजागी यंदा भाजपने राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी कॉँग्रेसने येथून काही नामांकित उमेदवारांना उभे करूनही त्यांना विजयश्री संपादन करता आलेली नाही. यापूर्वी कॉँग्रेसने येथून अभिनेते राजेश खन्ना, माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन तसेच माजी पोलीस उपमहासंचालक पी. के. दत्ता अशा नामांकित उमेदवारांना येथून लढविले होते. यंदा डॉ. सी. जे. चावडा यांना उमेदवारी दिली आहे. चावडा हे शाह यांच्याविरोधात कितपत प्रभाव पाडू शकतील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.


जनावरांचे डॉक्टर असलेले चावडा राजकारणात येण्यापूर्वी उपजिल्हाधिकारी होते. ते दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. चावडा हे ठाकूर समाजाचे असून हा समाज सातत्याने कॉँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. ही लढत अमित शहा विरुद्ध चावडा अशी नसून भाजप विरुद्ध कॉँग्रेस अशी असल्याचे चावडा यांनी सांगितले आहे. कॉँग्रेसचे नेते हे मागील महिन्यामध्ये गुजरातमध्ये आले होते. त्यावेळी त्यांना मिळालेला प्रतिसाद बघता जनतेत भाजपाच्या कारभाराबद्दल राग आहे. तो मतपेटीतून व्यक्त होईल, असे मत कॉँग्रेसचे उमेदवार चावडा यांनी व्यक्त केले आहे.

>सर्वाधिक मतदार
गांधीनगर मतदारसंघ हा गुजरातच्या २६ मतदारसंघांमधील सर्वाधिक मतदारसंख्येचा आहे. येथे १९.२१ लाख मतदारांनी नावनोंदणी केली आहे. ही गुजरातमधील सर्वाधिक मतदारसंख्या आहे. यात पाटीदार मतदार सर्वाधिक असून त्यापाठोपाठ ठाकूर समाजाचे मतदान आहे. या मतदारसंघात सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यापैकी पाच जागा भाजप कडे तर निमशहरी भागात दोन जागा कॉँग्रेसकडे आहेत. ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व वाजपेयी आणि अडवाणी यांनी केले आहे, त्यामधून मला उमेदवारी करता येणे, हे मी माझे भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया शहा यांनी दिली होती. शहा यांचा येथे चांगला संपर्क आहे. यापूर्वी ते चार वेळा आमदार होते.

Web Title: The challenge for the Congress to defeat Gandhinagar, the BJP has been in the forefront for three decades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.