Vidhan Sabha Adhiveshan: जी काही चौकशी करायची ती करा; पत्रांवरून चंद्रकांत पाटलांचे सरकारला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 11:11 AM2021-07-05T11:11:20+5:302021-07-05T11:21:08+5:30
Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांचा जरंडेश्वर साखर कारखाना (Jarandeshwar suger mill) ईडीने सील केला. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिल्याने राज्यात वादंग निर्माण झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांचा जरंडेश्वर साखर कारखाना (Jarandeshwar suger mill) ईडीने सील केला. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिल्याने राज्यात वादंग निर्माण झाला आहे. यामुळे पाटील आणि गडकरी अडचणीत येण्याची शक्यता असून त्यांनी आज खुलेपणे चौकशीचे आव्हान दिले आहे. (Chandrakant patil talk on letter to amit shah about sachin vaze and Jarandeshwar suger factory.)
गेल्या आठवड्यामध्ये दोन पत्रे मी अमित शहांना लिहिली. त्यातील एक पत्र सचिन वाझेने एनआयए न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र दिले आहे, त्याबाबत आहे. त्यावर सीबीआय चौकशी लावावी अशी मागणी केली आहे. जर परमबीर सिंहांनी लिहिलेल्या पत्रावर चौकशी लागत असेल तर वाझेने स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या पत्राची चौकशी का होऊ नये असे पत्र आपण अमित शहांना पाठविल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
दुसरे पत्र जरंडेश्वर साखर कारखान्याच्या विक्री घोटाळ्यावर लिहिल्याचे ते म्हणाले. जे कारखाने मातीमोल दराने विकले त्याची चौकशी करा. असे अनेक कारखाने आहेत, ते राज्य सरकारी बँकेने नुकसान झाल्याने विकले आहेत. नितीन गडकरींनी जे कारखाने घेतले ते त्यांनीच याचिका दाखल झाली होती, तेव्हा खुलासा केला आहे. नितीन गडकरींनी घेतलेले कारखाने हे लोकाग्रहास्तव घेतले आहेत. बँकेने सांगितलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीला विकत घेतलेले आहेत. गडकरी खुल्या मनाने चौकशी करा असे सांगतात. त्यात मी काही नवीन म्हटलेले नाही, असे पाटील म्हणाले. मी पाठवलेल्या पत्रांची जी काही चौकशी करायची आहे ती करा, असे आव्हानही पाटलांनी दिले आहे.