“कोणलाही शरद पवारांची अ‍ॅलर्जी असण्याचे कारण काय?”; छगन भुजबळांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 01:28 PM2022-01-11T13:28:59+5:302022-01-11T13:29:49+5:30

शरद पवारांनी गिरणी संप पाहिलेला असून, त्यांना एसटी कर्मचाऱ्यांची काळजी वाटणे साहजिक असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

chhagan bhujbal replied gopichand padalkar over sharad pawar criticism on st strike | “कोणलाही शरद पवारांची अ‍ॅलर्जी असण्याचे कारण काय?”; छगन भुजबळांचा पलटवार

“कोणलाही शरद पवारांची अ‍ॅलर्जी असण्याचे कारण काय?”; छगन भुजबळांचा पलटवार

Next

नाशिक: गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Strike) सुरू असून, अनेक ठिकाणच्या एसटी सेवा अद्यापही ठप्पच आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी कामगारांच्या कृती समितीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यानंतर अनिल परब (Anil Parab) यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर अनेक संघटनांनी या संपातून माघार घेतल्याची घोषणा केली. यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शरद पवार आणि अनिल परब यांच्यावर केलेल्या टीकेला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सोडवणे ही महाविकासआघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी एसटी संप सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. कोणलाही शरद पवार यांची अ‍ॅलर्जी असण्याचे कारणच काय? शरद पवार हे फक्त राज्यातीलच नव्हे तर देशातील अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाला आणि मताला देशात किंमत आहे. याशिवाय, शरद पवार हे महाविकासआघाडीतील एका पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. महाराष्ट्रातील एसटी कामगारांच्या संपाचा तिढा दोन महिन्यांपासून सुटलेला नाही. त्यामुळे शरद पवार यांना कामगारांची काळजी वाटणे साहजिक आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. 

शरद पवार यांना एसटी कर्मचाऱ्यांची काळजी वाटणे साहजिक

शरद पवार किंवा मी, आम्ही दत्ता सामंत यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईत झालेला गिरणी कामगारांचा संप बघितला आहे. हा गिरणी संप संपल्याचे आजवर कोणीही जाहीर केलेले नाही. त्यामुळे गिरण्यांमधील कामगार देशोधडीला लागले. एवढा अट्टाहास करता कामा नये. एसटी कामगारांना समजावण्याचा आणि राज्यकर्ते चुकत असतील त्या त्रुटींवर बोट ठेवण्याचा हक्कही शरद पवार यांना असून, त्यांना काळजी वाटणे साहजिक आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. 

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवली म्हणून शरद पवारांना चर्चा करावी लागली. एसटी कर्मचाऱ्यांनी एकजुटीने लढा दिला यासाठी मी अभिनंदन करतो. कोणत्याही युनिअनची सभासद फी भरली नाही, महसुलात घट आणली त्यामुळेच शरद पवारांना तुमच्यासोबत चर्चा करण्यास भाग पाडले, असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला.
 

Web Title: chhagan bhujbal replied gopichand padalkar over sharad pawar criticism on st strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.