छत्रपती संभाजी महाराज हे तर आमचे दैवत!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 06:15 AM2021-01-09T06:15:09+5:302021-01-09T06:15:47+5:30

बाळासाहेब थोरात ;  विषयाला फाटे फोडून वातावरण कलुषित करू नका

Chhatrapati Sambhaji Maharaj is our God! : Balasaheb Thorat on Shiv sena remark | छत्रपती संभाजी महाराज हे तर आमचे दैवत!

छत्रपती संभाजी महाराज हे तर आमचे दैवत!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. काँग्रेसचा संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नसून ते आमचे आराध्यदैवत आणि श्रद्धास्थान आहेत. या विषयाला फाटे फोडून कलुषित वातावरण निर्मिती होऊ नये, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.


थोरात शुक्रवारी ठाण्यात आले असता त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयास भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. थोरात म्हणाले, राज्यातील सरकारमध्ये आम्ही तीन पक्ष आहोत. आम्हाला प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची संधी आहे. भाजपची जातीयवादी विचारसरणी आणि हुकूमशाही कार्यपद्धती मान्य नसल्याने आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे आम्ही आमचा पक्ष वाढवत असताना महाविकास आघाडीत आहोत. सरकारमध्ये प्रत्येक वेळी योग्य पद्धतीने चर्चा करून निर्णय घेऊ . 


थोरात यांना प्रदेशाध्यक्षपदावरील बदलांबाबत विचारले असता ते म्हणाले, माझ्याकडे तीन महत्त्वाची पदे आहेत. तरुण मंडळींना संधी देऊन नवे नेतृत्व घडवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेऊ शकतात. शासकीय विश्रामगृहात थोरात यांची ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील आदींनी भेट घेतली. . तसेच ठाण्यात उभारण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्यांबाबतही चर्चा केली. या पुतळ्यांसाठी ठाणे महापालिकेने अर्थसंकल्पात तरतूद केल्याचे कार्यकर्त्यांनी थोरात यांच्या निदर्शनास आणून दिले. या वेळी प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार मोहन जोशी, मनोज शिंदे, शहराध्यक्ष विक्रांत शिंदे, शहर काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे, सुरेश पाटील-खेडे आदी उपस्थित होते.

माझ्याकडे तीन महत्त्वाची पदे आहेत. एकाच व्यक्तीकडे तीन पदे असल्यावर साहजिकच कोणालाही हेवा वाटणार आहे. पक्षश्रेष्ठींना वाटले तर ते माझ्याकडील जबाबदारीचे विभाजन करू शकतात व इतरांना संधी देऊ शकतात. तरुण मंडळींना संधी देऊन नवे नेतृत्व घडवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेऊ शकतात.
- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

Web Title: Chhatrapati Sambhaji Maharaj is our God! : Balasaheb Thorat on Shiv sena remark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.