"छत्रपती संभाजी महाराजांचं नाव मोठं, विरोध करण्याचं कारण नाही,’’ पक्षाचा विरोध असताना काँग्रेसच्या या मंत्र्याने मांडलं वेगळं मत

By बाळकृष्ण परब | Published: January 7, 2021 05:30 PM2021-01-07T17:30:51+5:302021-01-07T17:37:31+5:30

Vijay Vadettiwar : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराविरोधात पुन्हा एकदा स्पष्ट मत मांडलं असताना राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे.

"Chhatrapati Sambhaji Maharaj's name is big, there is no reason to protest," said the Congress minister Vijay Vadettiwar | "छत्रपती संभाजी महाराजांचं नाव मोठं, विरोध करण्याचं कारण नाही,’’ पक्षाचा विरोध असताना काँग्रेसच्या या मंत्र्याने मांडलं वेगळं मत

"छत्रपती संभाजी महाराजांचं नाव मोठं, विरोध करण्याचं कारण नाही,’’ पक्षाचा विरोध असताना काँग्रेसच्या या मंत्र्याने मांडलं वेगळं मत

googlenewsNext
ठळक मुद्देछत्रपती संभाजी महाराजांचं नाव मोठं आहे. त्याला विरोध करण्याचं कारण नाहीमात्र सामाजिक सलोखा बिघडता कामा नयेऔरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून सध्या महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे खडाखडी

मुंबई - औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून सध्या महाविकास आघाडीमध्ये खडाखडी सुरू आहे. एकीकडे शिवसेनेने नामांतरावरून आग्रही भूमिका घेतली असताना काँग्रेसने मात्र सुरुवातीपासून नामांतराला विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराविरोधात पुन्हा एकदा स्पष्ट मत मांडलं असताना राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव मोठं आहे. त्याला विरोध करण्याचं कारण नाही, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याबाबत आपली भूमिका मांडताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव मोठं आहे. त्याला विरोध करण्याचं कारण नाही. मात्र सामाजिक सलोखा बिघडता कामा नये, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतराबाबत आज पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली होती. महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहोत, पण नामांतराला आमचा विरोध राहील, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलं. महाविकास आघाडीमध्ये किमान समान कार्यक्रम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहील. पण, अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय. राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची अवहेलना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याचा आधारावर निर्माण झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहील, असे बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितलं होतं. 

शिवसेना नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख नेहमीच संभाजीनगर असाच केला जातो. विशेष म्हणजे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक बातमी शेअर करताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता. तर, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनीही आपल्या पत्रावर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केला होता. त्यामुळे, सरकारकडून औरंगाबादचे नामकरण करुन संभाजीनगर हे नवीन नाव ठेवण्याच्या हालचाली होत असल्याचं चर्चा होती.

Web Title: "Chhatrapati Sambhaji Maharaj's name is big, there is no reason to protest," said the Congress minister Vijay Vadettiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.