छत्रपती संभाजीराजे अन् उदयनराजेंनी धनगर आरक्षणात लक्ष घालावं; कोल्हापूरात गोलमेज परिषद संपन्न

By प्रविण मरगळे | Published: October 2, 2020 06:01 PM2020-10-02T18:01:06+5:302020-10-02T18:01:45+5:30

Dhangar Parishad, Ram Shinde News: गोलमेज परिषदेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन हा विषय मार्गी लावाला अशी मागणी लावून धरली आहे. कोल्हापूरात धनगर गोलमेज परिषद पार पाडली असं राम शिंदेंनी सांगितले.

Chhatrapati Sambhaji Raje, Udayan Raje should pay attention to Dhangar reservation Says Ram Shinde | छत्रपती संभाजीराजे अन् उदयनराजेंनी धनगर आरक्षणात लक्ष घालावं; कोल्हापूरात गोलमेज परिषद संपन्न

छत्रपती संभाजीराजे अन् उदयनराजेंनी धनगर आरक्षणात लक्ष घालावं; कोल्हापूरात गोलमेज परिषद संपन्न

googlenewsNext

कोल्हापूर -  छत्रपती शाहू महाराजांचे वारस असलेले खासदार संभाजीराजेंनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा द्यावा, त्यांनी लक्ष द्यावं, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल तेव्हा धनगर आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागावा यासाठी छत्रपती संभाजीराजे, उदयनराजेंकडे मागणी करणार आहे असं धनगर समाजाचे नेते आणि माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी म्हटलं आहे.

कोल्हापूरात धनगर समाजाची पहिली गोलमेज परिषद संपन्न झाली, या बैठकीच्या निमित्ताने धनगर समाजातील अनेक नेते, मान्यवर कोल्हापुरात दाखल झाले होते. यावेळी राम शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक वेळा सत्तांतरे झाली, जो विरोधी पक्षात असतो तो म्हणतो, सत्तेत आल्यावर आम्ही आरक्षण देऊ, आणि जो सत्तेत असतो तोही म्हणतो आम्ही देऊ अशी भावना ७० वर्षात झाली आहे. त्यामुळे लोक या सगळ्याला वैतागली आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच  मी राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलो तरी लोकं आता वैतागली आहे. गेल्या ७० वर्षापासून सत्ताधारी आणि विरोधकांनी धनगर समाजाची फसवणूक केली अशी भावना लोकांमध्ये आहे. त्यामुळे गोलमेज परिषदेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन हा विषय मार्गी लावाला अशी मागणी लावून धरली आहे. कोल्हापूरात धनगर गोलमेज परिषद पार पाडली असं राम शिंदेंनी सांगितले.

गोलमेज परिषदेत मांडलेले ठराव

महाराष्ट्रात धनगर समाज १२ पोटशाखेंमध्ये विखुरला आहे. प्रत्येक पोटशाखेत कोणी ना कोणी नेता आहे, राजकीय पक्षाचा नेता, आजीमाजी आमदार, खासदार आणि समाजातील प्रतिष्ठित मान्यवर आहे, अशा सर्व लोकांनी घटनेमध्ये दिलेले आरक्षण या थेट आणि तात्काळ लाभ मिळेपर्यंत ‘धनगर सारा एक’ या भावनेतून आंदोलन करायचं, सर्वानुमते हा ठराव समंत केला.

गोलमेज परिषद तातडीने भरवली, अनेक पक्षाचे पदाधिकारी सहभागी होऊ शकले नाहीत, परंतु फोनवरुन त्यांना पाठिंबा दर्शवला आहे, गोलमेज परिषदेची व्याप्ती वाढवून पुन्हा बैठक घ्यावी

धनगर समाजाचा पारंपारिक व्यवसाय मेंढपाळ आणि भटकंती आहे, प्रत्येक जिल्ह्यातून तो प्रवास करत असतो, तेव्हा मेंढपाळांवर हल्ले होतात, त्यावर राज्य शासनाने तात्काळ कठोर कायदा आणून मेंढपाळांना संरक्षण देण्याची मागणी

Web Title: Chhatrapati Sambhaji Raje, Udayan Raje should pay attention to Dhangar reservation Says Ram Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.