मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केला; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघाती आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 06:06 AM2021-03-04T06:06:23+5:302021-03-04T06:06:59+5:30

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी, ‘मुख्यमंत्र्यांचे भाषण हे चौकात बोलल्यासारखे होते. सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बोलायचे असते हे त्यांच्या अजूनही लक्षात येत नाही. वीज कनेक्शन कापण्यापासून कृषी विम्यापर्यंतच्या एकाही मुद्द्यावर ते बोलले नाहीत, त्यांनी राज्यातील जनतेचा पूर्णत: भ्रमनिरास केला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

The Chief Minister insulted the Indian soldiers: Devendra Fadanvis | मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केला; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघाती आरोप

मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केला; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघाती आरोप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना अमेरिकेपासून काश्मीर-कन्याकुमारीपर्यंत मुख्यमंत्री फिरून आले पण महाराष्ट्रावर काहीच समाधानकारक बोलले नाहीत. त्यातच त्यांनी भारतीय सैनिकांचा अपमान केला, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.


मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी, ‘मुख्यमंत्र्यांचे भाषण हे चौकात बोलल्यासारखे होते. सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बोलायचे असते हे त्यांच्या अजूनही लक्षात येत नाही. वीज कनेक्शन कापण्यापासून कृषी विम्यापर्यंतच्या एकाही मुद्द्यावर ते बोलले नाहीत, त्यांनी राज्यातील जनतेचा पूर्णत: भ्रमनिरास केला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. फडणवीस म्हणाले की, ‘चीनसमोर आला की पळे’ हे मुख्यमंत्र्यांचे विधान सैनिकांचा अपमान करणारे आहे. उणे ३० च्या तापमानात देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांनी एक इंचही जमीन चीनला मिळू दिली नाही, मग मुख्यमंत्री असे विधान कसे काय करू शकतात?  

आमच्या हिंदुत्वावर शंका घेऊ नका
nगृहमंत्री अमित शहा यांच्या संदर्भात मुख्यमंत्री उसने अवसान आणून बोलले. सत्य काय ते त्यांना माहिती आहे. खोटं बोला पण रेटून बोला हे मुख्यमंत्र्यांचे नवे रुप बघायला मिळाले असे फडणवीस म्हणाले. 
nशिवसेना स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हती हे मुख्यमंत्री म्हणाले पण सोबतच त्यांनी रा. स्व. संघाचा उल्लेख केला. संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार हे स्वत:च स्वातंत्र्यसैनिक होते. 
nआमच्या हिंदुत्वावर शंका घेणारे मुख्यमंत्री हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत, हे कुठले हिंदुत्व, असा सवाल फडणवीस यांनी केला. 
nहिंदुंचा अपमान करणाऱ्या शर्जिल उस्मानीची उत्तर प्रदेशात हिंदुंविरुद्ध गरळ ओकण्याची हिंमत झाली नाही, त्यासाठी तो महाराष्ट्रात येऊन बोलला, अशी टीका त्यांनी केली.

Web Title: The Chief Minister insulted the Indian soldiers: Devendra Fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.