Chiplun Flood : "संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले?, हे तर पळपुटे मंत्री"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 12:18 PM2021-07-24T12:18:04+5:302021-07-24T12:31:43+5:30
Chiplun Flood BJP Chitra Wagh Slams Anil Parab : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकार आणि अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई - ढगच फाटल्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र भीषण महापुराचा सामना करीत असताना गुरुवारची रात्र काळरात्र ठरली. धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यावर दरडसंकट कोसळले आणि त्यात 85 जणांचा बळी गेला. याच दरम्यान कुणी स्वयंपाकघरात ओट्यावर दिवसभर उभे आहे, कुणी तासनतास पोटमाळ्याचा आधार घेतला आहे, अगदीच नाईलाज झाल्याने कुणी कौलावर चढून मुसळधार पावसात उभे आहे. जगण्यासाठीची ही धडपड आहे चिपळुणातील पूरग्रस्तांची. हेलिकॉप्टरने पूरग्रस्तांना मदत करण्याची घोषणा पालकमंत्री अनिल परब यांनी केली असली तरी शुक्रवारी दिवसभरात एकही हेलिकॉप्टर मदतीसाठी आले नाही.
वीज नसल्याने सायंकाळनंतर सर्व भाग अंधारला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भयभीत झाले असून मदतीसाठी टाहो फोडत आहेत. याच दरम्यान भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Kishor Wagh) यांनी ठाकरे सरकार आणि अनिल परब (Anil Parab) यांच्यावर निशाणा साधला आहे. "संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले?, हे तर पळपुटे मंत्री" असं म्हणत चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी अनिल परब रात्रीतून मुंबईला पळ काढतात असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
आस्मानी संकटामुळं चिपळूणचे नागरिक
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 24, 2021
अन्न-पाण्यावाचून तडफडतायेत एवढचं नाही तर पुरामुळे दवाखान्यातून ॲाक्सिजन पुरवठा रद्द झाल्याने एकाच दिवशी ८ कोविड रूग्ण दगावले अशा वेळेस पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी @advanilparab रात्रीतून मुंबईला पळ काढतात (१/२) pic.twitter.com/h8oIWuIk6C
"आस्मानी संकटामुळं चिपळूणचे नागरिक अन्न-पाण्यावाचून तडफडतायेत एवढचं नाही तर पुरामुळे दवाखान्यातून ऑक्सिजन पुरवठा रद्द झाल्याने एकाच दिवशी 8 कोविड रूग्ण दगावले, अशा वेळेस पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी अनिल परब रात्रीतून मुंबईला पळ काढतात, अशा संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले? हे तर पळपुटे मंत्री आहेत" अशी शब्दांत चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
चिपळूणमध्ये पुराच्या पाण्यात वेढलेल्या दोन खासगी कोविड रुग्णालयांतील 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून, अन्य सहा नागरिकांचा बुडून मृत्यू झाला आहे. चिपळूणमधील अपरांत हॉस्पिटल पुराच्या पाण्याने वेढले गेले होते. त्यात आठ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते; मात्र पाणी भरल्यानंतर वीजप्रवाह खंडित झाला आणि व्हेंटिलेटर यंत्रणा बंद पडली. त्यामुळे या आठही जणांचा मृत्यू झाला. अन्य एका कोविड रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मदतकार्य करणाऱ्यांना सहा मृतदेह सापडले आहेत. आतापर्यंत चिपळूणमधील बळींची संख्या 16 वर पोहोचली आहे.
"मुंबईकरांची एवढी वाट लावून ही महापालिका पहिली कशी हा लोकांना प्रश्न पडेल पण..."#MNS#SandeepDeshpande#ThackerayGovernment#BMC#MumbaiRains#Politics@SandeepDadarMNShttps://t.co/3x7YacfuXrpic.twitter.com/R2JseWY6DH
— Lokmat (@MiLOKMAT) July 19, 2021