chiplun flood: चिपळूण पुन्हा उभे करुन दाखवू, मुख्यमंत्र्यांनी चिपळूणवासियांना दिला शब्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 15:01 IST2021-07-25T15:00:02+5:302021-07-25T15:01:48+5:30
chiplun flood: काय नुकसान झाले आहे ते आपणा पाहिले आहे. आपण चिपळूण पुन्हा उभे करुन दाखवू, असा दिलासा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चिपळुणातील व्यापाऱ्यांना दिला.

chiplun flood: चिपळूण पुन्हा उभे करुन दाखवू, मुख्यमंत्र्यांनी चिपळूणवासियांना दिला शब्द
चिपळूण - काय नुकसान झाले आहे ते आपणा पाहिले आहे. आपण चिपळूण पुन्हा उभे करुन दाखवू, असा दिलासा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चिपळुणातील व्यापाऱ्यांना दिला.
महापुरात उध्वस्त झालेल्या चिपळूणची पाहणी करण्यासाठी रविवारी ते आले होते. रत्नागिरी गॕस प्रकल्पाच्या हेलिपॕडवर उतरुन ते चिपळूणला दोन दोन ठिकाणी पाहणी करुन ते आढावा बैठकीसाठी जात होते. मात्र वाटेत पानगल्ली येथे असंख्य व्यापारी थांबले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तेथे थांबावेच लागले.
यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात मांडल्या. पाणी आयत्यावेळी सोडण्यात आल्याने कमी वेळात पुराचे प्रमाण वाढले. अशा लोकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली. त्याचवेळी त्यांनी चिपळूण पुन्हा उभे करण्याचा दिलासा दिला आणि ते बैठकीला रवाना झाले.