लोकजनशक्ती पक्षातील घडामोडींवर चिराग पासवान पहिल्यांदाच बोलले, भावूक होऊन म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 04:33 PM2021-06-15T16:33:56+5:302021-06-15T16:35:30+5:30

Chirag Paswan News: काका पशुपती पारस यांनी केलेली बंडखोरी आणि इतर नेत्यांकडून त्याला मिळालेली साथ यावर चिराग पासवान यांनी मौन सोडत प्रथमच भाष्य केलं आहे.

Chirag Paswan spoke for the first time on the developments in the Lok Janshakti party. | लोकजनशक्ती पक्षातील घडामोडींवर चिराग पासवान पहिल्यांदाच बोलले, भावूक होऊन म्हणाले...

लोकजनशक्ती पक्षातील घडामोडींवर चिराग पासवान पहिल्यांदाच बोलले, भावूक होऊन म्हणाले...

googlenewsNext

पाटणा - स्वपक्षीय आणि कुटुंबीयांनीच दगाबाजी करून पक्षावर कब्जा केल्याने दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांना जबरदस्त धक्का बसला आहे. दरम्यान, काका पशुपती पारस (Pashupati Paras) यांनी केलेली बंडखोरी आणि इतर नेत्यांकडून त्याला मिळालेली साथ यावर चिराग पासवान (Chirag Paswan ) यांनी मौन सोडत प्रथमच भाष्य केलं आहे. या घटनाक्रमावर बोलताना चिराग पासनाव यांनी भावूक होत पक्ष आणि कुटुंबाला एकजूट ठेवण्यात आपण अपयशी ठरलो, असे म्हटले आहे.  (Chirag Paswan spoke for the first time on the developments in the Lok Janshakti party)

चिराग पासवान यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी काका पशुपती पारस यांना लिहिलेली काही पत्रे शेअर केली आहेत. दरम्यान, या ट्विटमध्ये चिराग पासवान म्हणाले की, माझ्या वडलांनी स्थापन केलेला हा पक्ष आणि माझ्या कुटुंबाला एकजूट ठेवण्याचा प्रयत्न मी केला. मात्र त्यात मी अयशस्वी ठरलो. पक्ष हा मातेसमान असतो. त्यामुळे आईची फसवणूक करता कामा नये. लोकशाहीमध्ये जनता ही सर्वोपरी असते. पक्षावर विश्वास ठेवणाऱ्यांचे मी आभार मानतो. 



गेल्या काही दिवसांत घडलेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये लोकजनशक्ती पक्षात मोठी उलथापालथ होऊन पक्षाची सर्व सूत्रे रामविलास पासवान यांचे भाऊ पशुपती पारस यांच्या हाती गेली आहेत. पशुपती पारस यांना पक्षाच्या संसदीय दलाचा नेता निवडण्यात आले आहे. तर पक्षाच्या अध्यक्षपदावरून चिराग पासवान यांची उचलबांगडी करण्याची तयारीही सुरू आहे. 

दरम्यान, लोकजनशक्ती पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सूरजभान सिंह यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या पाच दिवसांत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार आहे. आता सूरजभान सिंह यांच्या अध्यक्षतेखालीच पक्षाची बैठक होईल. तसेच येणाऱ्या काही दिवसांत राष्ट्रीय कार्यकारिणीचीही बैठक आयोजित होणार आहे. 

Web Title: Chirag Paswan spoke for the first time on the developments in the Lok Janshakti party.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.