Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे उद्या भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 11:26 PM2021-06-16T23:26:53+5:302021-06-16T23:27:54+5:30
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे उद्या भेटणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबई:मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राजकारण तापताना दिसत आहे. भाजप खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात मूक आंदोलन पार पडले. या आंदोलनानंतर राज्य सरकारने आम्हाला चर्चेचे निमंत्रण दिले आहे. ही सकारात्मक गोष्ट आहे. त्यामुळे आम्हीही सरकारला सकारात्मक प्रतिसाद देणार आहोत, असे संभाजीराजे यांनी सांगितले. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे उद्या भेटणार असल्याची माहिती मिळाली आहे. (cm uddhav thackeray and sambhaji raje likely to meet on thursday over maratha reservation)
मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवार, १७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक बोलविली आहे. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, सतेज पाटील यांची उपस्थिती असणार आहे. या बैठकीत संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार असून, यावेळी संभाजीराजे यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख समन्वयकही या बैठकीस उपस्थित असतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
“मुख्यमंत्र्यांनी OBC आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, तर राजीनामा देणाचं धाडस दाखवणार का?”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचे आवाहन
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मराठा आरक्षणासंदर्भातील मूक आंदोलनात उपस्थिती लावत संभाजीराजेंना मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचे आवाहन केले होते. यावर, राज्य सरकारने चर्चेचे आमंत्रण दिले असले तरी नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि रायगडचे नियोजित आंदोलन होणारच आहे. सरकारबरोबर सकारात्मक चर्चा झाल्यास नाशिकचे आंदोलन विजयोत्सव म्हणून साजरा करू, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
“आमच्याकडे चावी आहे, त्यानं मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू”; संजय राऊतांचे प्रत्युत्तर
पंतप्रधान मोदींनी भूमिका स्पष्ट करावी
मला उपमुख्यमंत्री अजित पवार भेटून गेले. त्यांनी मागण्यांना तत्वतः मान्यता दिली आहे. घटनेत आतापर्यंत अनेक अमेण्डमेंट झाल्या. आता अजून एक करायला काय हरकत आहे? पंतप्रधानांसमोर आणखी एकदा हा विषय गेला पाहिजे. पंतप्रधानाचे विचार काय ते स्पष्ट झाले नाहीत. त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी खासदार संभाजीराजेंचे वडील छत्रपती शाहू महाराज यांनी यावेळी केली.