"उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा; अन्यथा..."
By कुणाल गवाणकर | Published: January 13, 2021 06:47 PM2021-01-13T18:47:48+5:302021-01-13T18:51:28+5:30
धनंजय मुडेंनी राजीनामा न दिल्यास रस्त्यावर उतरू; पाटील यांचा इशारा
मुंबई: गायिकेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहे. धनंजय मुंडेंनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा. ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा लोकांचा आवाज म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.
बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले धनंजय मुंडे पोहोचले शरद पवारांच्या भेटीला
गायिका रेणू शर्मानं धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. तिनं केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला हवी. त्यातून सत्य समोर येईल. मात्र त्याआधी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा. ते राजीनामा देण्यास तयार नसतील, तर सरकारचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी किंवा राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून शरद पवारांनी त्यांना राजीनामा देण्यास सांगायला हवं, असं पाटील म्हणाले.
'धनंजय मुंडेंनी दुसऱ्या विवाहाची माहिती लपवली'; भाजप नेत्याची निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार
धनंजय मुंडेंनी संवेदनशीलपणे निर्णय घ्यायला हवा. अन्यथा लोकांचा आवाज म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू. धनंजय मुंडे यांच्या हातून चूक घडली आहे. माणसाच्या हातून चुका होत असतात. पण राजकारणाचे काही नियम आहेत. त्यात मुंडेंची चूक बसत नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला हवा. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अतिशय नैतिकपणे राजकारण करतात. आतापर्यंत त्यांनी शुद्ध राजकारण केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात ते योग्य निर्णय घेतील, असं पाटील यांनी पुढे म्हटलं.
धनंजय मुंडे प्रकरणी भाजपानं सोडलं मौन; “गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री राजीनामा देतील वाटत नाही,पण...”
रेणू शर्मांनी केलेल्या आरोपांची चौकशी पोलीस करतील. त्यांच्या आरोपात तथ्य आढळल्यास मुंडेंना शिक्षा होईल आणि आरोप खोटे असल्यास शर्मांना शासन होईल. पण या प्रकरणी स्पष्टीकरण देत असताना मुंडेंनी दिलेल्या कबुलीजबाबाचं काय?, असा सवाल पाटील यांनी विचारला. 'रेणू शर्माची बहिण करुणा शर्मासोबत माझे संबंध होते. त्यातून मला दोन मुलं झाली. त्यांच्या शालेय कागदपत्रांवर माझं नाव आहे, अशी कबुली त्यांनी दिली. मात्र निवडणूक लढवताना दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी ही माहिती लपवली,' असं पाटील पत्रकारांना संबोधित करताना म्हणाले.