“आंदोलने कसली करता? कोरोना सरकारमान्य कार्यक्रम नाही”; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 04:34 PM2021-08-10T16:34:20+5:302021-08-10T16:35:10+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत आंदोलने कसली करता? कोरोना सरकारमान्य कार्यक्रम नाही, या शब्दांत विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.

cm uddhav thackeray slams opposition about agitation against various issues | “आंदोलने कसली करता? कोरोना सरकारमान्य कार्यक्रम नाही”; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले

“आंदोलने कसली करता? कोरोना सरकारमान्य कार्यक्रम नाही”; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले

Next

ठाणे: कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याचे आढळून आले आहे. लॉकडाऊन, निर्बंध, कोरोना लसीकरणाचे नियोजन, ऑक्सिजन, बेड्स यांची कमतरता यांसारख्या अनेकविध विषयांवरून विरोधकांनी ठाकरे सरकारवर सातत्याने टीका केल्याचे पाहायला मिळाले. विविध मुद्द्यांवरून आंदोलनेही करण्यात आली. यामध्ये भाजप अग्रेसर असल्याचे दिसले. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत आंदोलने कसली करता? कोरोना सरकारमान्य कार्यक्रम नाही, या शब्दांत विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. (cm uddhav thackeray slams opposition about agitation against various issues)

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मीरा रोड येथे हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लांट सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चांगलेच फटकारले.

“दोन्ही डोस घेतलेले मुख्यमंत्री आतातरी मंत्रालयात जाणार की अजूनही वर्क फ्रॉम?”

अरे आंदोलने कसली करताय?

 कोरोनाची लाट ओसरल्यानंतर विरोधकांनी आंदोलने सुरू केली आहेत. अमूक सुरू करा, तमूक सुरू करा, असं सांगत आहेत. अरे आंदोलने कसली करताय? कोरोना हा काही सरकारमान्य कार्यक्रम नाही. दुसरी लाट ओसरण्यासाठी किती कष्ट करावे लागले, याची कोणाला जाण नाही आणि भानही नाही. पण लाट ओसरल्यानंतर अमूक करा नाही तर आम्ही आंदोलन करू, तमूक करा नाही तर आंदोलन करू, असे इशारे दिले जात आहेत. अरे आंदोलन कसली करताय? कोरोना हा काय सरकार मान्य कार्यक्रम नाही. हा काही मोफत कोरोना वाटपाचा कार्यक्रम नाहीये. आंदोलन करायचे असेल तर जास्तीत जास्त ऑक्सिजन प्लांट लावण्याचं आंदोलन करा ना, या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. 

“हा टाइमपास कशाला?”; संसदेत प्रश्न विचारण्यावरुन राणेंची सुप्रिया सुळेंवर टीका

राज्यात काही जणांचे राजकारण सुरू आहे

दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे ऑक्सिजन प्लांट लावण्याची गरज काय आहे? जेव्हाचे तेव्हा बघू असा विचार केला असता तुम्ही. पुढची लाट येईल तेव्हा बघू. पुन्हा एकदा सरकारच्या डोक्यावर बसू असा विचार केला असता तुम्ही. पण प्रताप, तुम्ही तसा विचार केला नाही. तुम्ही ऑक्सिजन प्लांट सुरू केला. पण राज्यात काही जणांचे राजकारण सुरू आहे, असा आरोपही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केला. 
 

Web Title: cm uddhav thackeray slams opposition about agitation against various issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.