VIDEO: मिलिंद नार्वेकरांचा दापोलीतील बंगला जमीनदोस्त; किरीट सोमय्या म्हणाले करुन दाखवलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 02:55 PM2021-08-22T14:55:21+5:302021-08-22T14:55:55+5:30
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय व शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा दापोलीतील आलिशान बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय व शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा दापोलीतील आलिशान बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या बंगल्याच्या बांधकामाबाबत तक्रार केली होती. त्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. परवानगी न घेताच हा बंगला बांधल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती. आज या बंगल्याचं पाडकाम हाती घेण्यात आलं आहे आणि संपूर्ण बंगला पाडला जात आहे.
मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मिलिंद नार्वेकर यांचा हा बंगला होता. त्याचं पाडकाम करण्याचं काम आज सकाळपासून हाती घेण्यात आलं होतं. किरीट सोमय्या यांनी या कारवाईचा व्हिडिओ ट्विट केला असून करुन दाखवले!! असं कॅप्शन व्हिडिओला दिलं आहे. यासोबतच उद्या स्वत: दापोलीला जाऊन तोडकामाची पाहणी करणार असल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं आहे.
करून दाखविले !!!!
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 22, 2021
मिलींद नार्वेकर चा बंगलो तोडला.
मुरुड दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नर्वेकर यांचा बेकायदा बंगलो पाडण्याचे काम आत्ता सुरू झाले
पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा
उद्या मी दापोली ला जावून तोडकामाची पाहणी करणार pic.twitter.com/azpHTiFHlQ
पुढचा नंबर अनिल परब यांचा
आज मिलिंद नार्वेकरांच्या अनधिकृत बंगल्यावर कारवाई झाली. आता पुढचा नंबर राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांचा असणार असल्याचंही सोमय्यांनी म्हटलं आहे. आता अनिल परब यांच्या मालकीच्या रिसॉर्टवर हातोडा पडणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डावा हात असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीत मुरूड गावाच्या समुद्र किनाऱ्यावर ७२ गुंठा जागा घेतली. यात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या भव्य दुमजली बंगल्याचे काम सुरू आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. यासाठी परिसरातील जंगलाची, झाडांची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आल्याचंही सोमय्यांनी म्हटलं होतं.