मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना गंभीर इशारा; “तुम्हाला मुलंबाळं आहेत, कुटुंब आहे, जर मी मागे लागलो तर...”
By प्रविण मरगळे | Published: November 26, 2020 07:56 PM2020-11-26T19:56:21+5:302020-11-26T19:58:57+5:30
CM Uddhav Thackrey Interview, BJP News: मराठी महाराष्ट्रामध्ये गाडून त्याच्यावर तुम्ही नाचणार...आम्ही ते उघड्या डोळ्याने सहन करू?
मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परखड मुलाखत सामनातून उद्या वाचकांच्या भेटीला येणार आहे, तत्पूर्वी या मुलाखतीचे प्रोमो खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवरुन पोस्ट केले आहेत, या राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सडेतोड प्रश्न विचारत असताना उद्धव ठाकरेही जशास तसं उत्तर देताना पाहायला मिळत आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी विरोधकांना गंभीर इशारा दिल्याचं दिसून येते.
संजय राऊतांनी पोस्ट केलेल्या दुसऱ्या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, मराठी महाराष्ट्रामध्ये गाडून त्याच्यावर तुम्ही नाचणार...आम्ही ते उघड्या डोळ्याने सहन करू? ज्यांना ज्यांना मुलबाळं आहेत, त्यांनी आरशात बघावं, तुम्हालाही मुलबाळं आहेत, तुम्हालाही कुटुंब आहेत, तुम्हीही धुतल्या तांदळासारखे नाही, जर मी मागे लागलो तर मग...अशा गंभीर इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे.(CM Uddhav Thackrey Interview with Sanjay Raut)
महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले?
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 26, 2020
second promo pic.twitter.com/EMKyjB3SNy
तसेच या प्रोमोत संजय राऊत यांनी राज्यात वाढीव वीजबिलावरून सुरु असलेल्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला आहे. यावर उद्धव ठाकरे काय उत्तर देतात हे मुलाखतीत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मागील काही दिवसापासून राज्यात वीजबिलावरून रणकंदन माजलं आहे. भाजपाने वीजबिल होळी आंदोलन केले तर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वीजबिलाच्या मुद्द्यावर राज्यभरात प्रचंड मोठे मोर्चे काढले त्यामुळे वीजिबिलाच्या या घटनेवर उद्धव ठाकरे काय सांगतात आणि भाजपा-मनसेवर काय भाष्य करतात याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
पहिल्या प्रोमोमध्ये काय म्हणाले उद्धव ठाकरे?
महाविकास आघाडीला वर्ष पूर्ण होत आहे. ही मुलाखत उद्या प्रसिद्ध होणार आहे. या अभिनंदन मुलाखतीचा प्रोमो पोस्ट करताना राऊत यांनी उद्या धमाका असे कॅप्शन दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे देखील काही प्रश्नांवर बिचकल्याचे दिसत आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरेंना राऊत काही बोचरे प्रश्न विचारताना दिसत आहेत. या प्रश्नांना मुख्यमंत्री कसे सामोरे जातात, काय उत्तरे देतात त्याची झलक दिसत आहे. ४४ सेकंदांचा हा प्रोमो आहे.
मुलाखतीच्या प्रोमोमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा सांगण्यापलिकडे काय करतात? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. यावर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारावजा उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, ''ठीक आहे, हात धुतो आहे, जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे जाईन'' हे असे विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका, कारण विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळते तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. कोणी कितीही आडवे आले त्या आडवे येणाऱ्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल, असा इशारा दिला होता.
खरंच मुख्यमंत्रिपदाचा शब्द उद्धव ठाकरेंना दिला होता?; भाजपा-शिवसेना युतीच्या पडद्यामागील घटना
आडवं करायचं असेल तर बोलता कशाला? – भाजपा प्रदेशाध्यक्ष
दसरा मेळाव्यातही उद्धव ठाकरेंचे भाषण असचं झालं, शेण, गोमुत्र, आडवे करू, तिडवे करू अशी भाषा मुख्यमंत्र्यांना न शोभणारी आहे, सर्वसामान्य जनतेलाही हे योग्य नाही कळतं, आडवं-तिडवं करायचं असेल तर बोलता कशाला? गरजेल तो पडेल काय? त्यामुळे जे काही त्यांना वाटतं करावं ते करून टाकावं असं आव्हान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.
भाजपाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये
बायका, मुलं आम्हाला पण आहे, म्हणून आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरतो या भ्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राहू नये, राज्याच्या सुव्यवस्थेकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं, कोरोनाच्या संकटावर मात करावी, दात पाडू, बघून घेऊ ही रोड छाप भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभते का? भाजपाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये असा इशारा भाजपाचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे.