हाथरस प्रकरणात योगींची मोठी कारवाई; एसपींसह ३ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, नार्को टेस्टचे आदेश

By प्रविण मरगळे | Published: October 2, 2020 11:27 PM2020-10-02T23:27:34+5:302020-10-02T23:31:15+5:30

Hathras Gangrape, CM Yogi Adityanath in Action on Police Officers News: राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या प्रकरणातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीबद्दल नाराज होते.  याच कारणास्तव SIT चा पहिला अहवाल येताच सरकारने ही मोठी कारवाई केली आहे.

CM Yogi major action in the Hathras case; Suspension of 3 police including SP, order of narco test | हाथरस प्रकरणात योगींची मोठी कारवाई; एसपींसह ३ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, नार्को टेस्टचे आदेश

हाथरस प्रकरणात योगींची मोठी कारवाई; एसपींसह ३ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, नार्को टेस्टचे आदेश

googlenewsNext
ठळक मुद्दे SIT चा पहिला अहवाल येताच सरकारने ही मोठी कारवाई केली आहे.प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाव्यतिरिक्त नार्को किंवा पॉलीग्राफ चाचणी करून इतर जबाबांच्या सत्यतेची पडताळणी केली जाईल.पीडितेच्या कुटूंबातील सदस्यांची आणि पोलीस तपासातील सर्व कर्मचार्‍यांची नार्को व पॉलीग्राफ चाचण्यांचे आदेश

लखनऊ – उत्तर प्रदेशातील बहुचर्चित हाथरस घटनेवर योगी सरकारनं कठोर कारवाईचं पाऊल उचललं आहे. आता या प्रकरणात आरोपींसह पीडिताच्या कुटुंबाचेही पॉलीग्राफ आणि नार्को टेस्ट करण्यात येणार आहे. एसआयटीचा पहिला अहवाल मिळाल्यानंतर सरकारने हा आदेश दिला आहे. एवढेच नव्हे तर हाथरसचे पोलीस अधीक्षक, डीएसपी आणि संबंधित पोलिस स्टेशन निरीक्षक यांनाही निलंबित करण्यात आलं आहे.

रात्री उशिरा सरकारने जारी केलेल्या प्रेस नोटद्वारे ही माहिती देण्यात आली. हे पहिल्यांदाच होत आहे जेव्हा एखाद्या प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलिसांच्या पथकाचीही पॉलीग्राफ आणि नार्को चाचणी करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या प्रकरणातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीबद्दल नाराज होते.  याच कारणास्तव SIT चा पहिला अहवाल येताच सरकारने ही मोठी कारवाई केली आहे.

...म्हणूनच होणार नार्को टेस्ट

या प्रकरणात एसआयटी चौकशी करत आहे. एसआयटीशिवाय वरिष्ठ पातळीवर असा आदेश देण्यात आला आहे की, या प्रकरणाचा तपास वैज्ञानिक पद्धतीने करावा, म्हणजेच प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाव्यतिरिक्त नार्को किंवा पॉलीग्राफ चाचणी करून इतर जबाबांच्या सत्यतेची पडताळणी केली जाईल. एसआयटीने हीच शिफारस सरकारला केली होती. त्या आधारे घटनेशी संबंधित सर्व लोकांशी नार्को टेस्ट आणि पॉलीग्राफी चाचणी घेतली जाईल.

सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात अनेक प्रकारचे व्हिडिओ आणि तथ्यदेखील समोर आले आहेत. म्हणूनच, सर्व पुराव्यांबाबत वैज्ञानिक तपासणी आवश्यक आहे. यामुळेच सरकारने आरोपी, पीडितेच्या कुटूंबातील सदस्यांची आणि पोलीस तपासातील सर्व कर्मचार्‍यांची नार्को व पॉलीग्राफ चाचण्यांचे आदेश दिले आहेत.

या अधिकाऱ्यांचे निलंबन

मुख्यमंत्री योगी यांच्या आदेशावरून हाथरसचे पोलिस अधीक्षक अर्थात एसपी विक्रांत वीर, कार्यक्षेत्र (सीओ) राम शब्द आणि संबंधित पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश कुमार वर्मा, एसआय जगवीर सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी हाथरसच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई होऊ शकते अशी बातमी मिळाली होती. परंतु सध्या त्यांचे नाव यादीत नाही.

या संपूर्ण घटनेत हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीणकुमार आणि एसपी विक्रांत वीर ज्या पद्धतीने कारवाई करत आहे. त्यावरुन त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटूंबाने हाथरसचे डीएम प्रवीण कुमार यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. पीडितेच्या कुटूंबीयांनीही प्रशासनावर धमकी आणि दबाव आणल्याचा आरोप केला आहे.

काय आहे प्रकरण?

हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. पीडित मुलगी आपल्या आईसह शेतात गेली होती आणि अचानक गायब झाली होती. नंतर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत ती आढळून आली. आरोपीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला होता. पीडित मुलीला दुसर्‍या दिवशी तिला अलिगढ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने उत्तम वैद्यकीय सुविधांकरिता तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आणि व्हेंटिलेटरवर होती. पण दुर्देवाने मंगळवारी तिने अखेरचा श्वास घेतला, यानंतर पोलिसांनी तिच्या आईवडिलांना दूर ठेवत तिच्या मृतदेहावर मध्यरात्री अंत्यसंस्कार केले

अलाहाबाद कोर्टाने स्वत:हून घेतली दखल

हाथरस प्रकरणाची अलाहाबाद कोर्टाने स्वत:हून दखल घेतली असून, याबाबत १२ ऑक्टोबरपर्यत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश राज्यातील गृहसचिव, पोलीस महासंचालक आणि हाथरसच्या पोलिसांना दिले आहेत.

बलात्कार झाला नाही शवचिकित्सा निष्कर्ष

उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातल्या दलित मुलीवर बलात्कार झाला नसल्याचे तिच्या शवचिकित्सेतून आढळून आले आहे. ही माहिती त्या राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांतकुमार यांनी गुरुवारी दिली. ते म्हणाले की, या दलित मुलीचा मृत्यू गळ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे झाल्याचे शवचिकित्सा अहवालात नमुद करण्यात आले आहे. तिच्या शवचिकित्सेमध्ये वीयार्चे अंश आढळून आले नाहीत.

Web Title: CM Yogi major action in the Hathras case; Suspension of 3 police including SP, order of narco test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.