मेट्रो कारशेडबाबत लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा खुल्या चर्चेला या! आशिष शेलार यांचे आदित्य ठाकरेंना आव्हान
By बाळकृष्ण परब | Published: November 6, 2020 03:49 PM2020-11-06T15:49:32+5:302020-11-06T15:54:59+5:30
Ashish Shelar News : लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या! आम्ही कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार आहोत, असे आव्हान शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे.
मुंबई - मेट्रो कारशेडच्या प्रस्तावामुळे सॉल्ट पॅनच्या लँडबाबत अप्रत्यक्षरीत्या उद्या होणाऱ्या 50 हजार कोटीच्या जागांच्या हस्तांतरणाच्या घोटाळ्याची पायाभरणी काँग्रेस सोबत करताय की काय? असा सवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भाजपचे नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या! आम्ही कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार आहोत, असे आव्हान शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे.
भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून मेंट्रो कारनशेड बाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी या पत्रात म्हटले की, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने कांजूर मार्गच्या जागेवर मेट्रो कारशेड प्रस्तावित केले आणि महाराष्ट्रातील इंच इंच जमीन महाराष्ट्राची अशी भावनिक अस्मितेची ढाल करून जनतेची दिशाभूल केली जातेय, त्याबद्दल स्पष्ट करू इच्छितो की, सदरची जागा महाराष्ट्राची नसून केंद्र सरकारचीच आहे. असा पहिला दावा केंद्र सरकार कडून १९८३ साली करण्यात आला. त्यावेळी कॉंग्रेसचेच सरकार होते. म्हणजेच महाराष्ट्रातील मुंबई मधील कांजूर मार्गची जी जागा आपण प्रस्तावित करत आहात ती महाराष्ट्राची नाही असा दावा त्यावेळच्या केंद्रातील कॉंग्रेसच्या सरकारने केला होता. ज्यांच्या सोबत आज आपण महाराष्ट्र विकास आघाडीत आहात.
मा.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेजींना जाहीर आवाहन..
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 6, 2020
आपण लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या! आम्ही कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार! @BJP4Maharashtra@ChDadaPatil@Dev_Fadnavispic.twitter.com/ecVzpt7R3o
कांजूर मार्गची जागा महाराष्ट्र सरकारची म्हणजेच महाराष्ट्राची असा दावा १९८३ साली असलेल्या केंद्र सरकारने म्हणजेच काँग्रेसने केलेला नाही. सदर जागा ही महाराष्ट्राचीच असा दावा २०१४ चा दावा आणि त्यावरील अंतिम निर्णय ज्यामुळे ही जागा महाराष्ट्राच्याच नावावर करण्यात यावी हा दावासुद्धा २०१४ साली करण्यात आला. याचा अर्थ तत्कालीन मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, मा. चंद्रकांतदादा पाटील आणि यांच्या सरकारचे हा दावा केला. दुर्दैव महाराष्ट्राचे एवढेच की ज्यांनी ही जागा दिल्लीची आहे, असे सांगणाऱ्या कॉंग्रेसच्या सोबत तुमची सलगी केली आहे. आणि ज्यांनी ही जागा महाराष्ट्राचीच आहे असा निर्णय दिला त्या भाजपा विरोधात तुम्ही लढता आहात.
कारशेडच्या प्रस्तावामुळे सॉल्ट पॅनच्या लँडबाबत अप्रत्यक्षरीत्या उद्या होणाऱ्या 50 हजार कोटीच्या जागांच्या हस्तांतरणाच्या घोटाळ्याची पायाभरणी आपण मा. उध्दव ठाकरेजी आज काँग्रेस सोबत करताय की काय? @BJP4Maharashtra@ChDadaPatil@Dev_Fadnavispic.twitter.com/Afby0qPgjB
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 6, 2020