Anil Deshmukh: “अनिल देशमुखांसाठी येणारा काळ कठीण; आणखी काही मंत्र्यांची बिंग फुटणार”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 12:53 PM2021-04-14T12:53:40+5:302021-04-14T13:04:43+5:30

अनिल देशमुख प्रकरणावर भाजपा खासदारानं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे 'ते' मंत्री कोण अशी चर्चा सध्या सुरू आहे.

“The coming time is difficult for Anil Deshmukh says BJP MP Manoj Kotak | Anil Deshmukh: “अनिल देशमुखांसाठी येणारा काळ कठीण; आणखी काही मंत्र्यांची बिंग फुटणार”

Anil Deshmukh: “अनिल देशमुखांसाठी येणारा काळ कठीण; आणखी काही मंत्र्यांची बिंग फुटणार”

Next

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासाठी येणारे दिवस कठीण असतील असं विधान भाजपा खासदार मनोज कोटक यांनी केलं आहे. इतकंच नाही तर येत्या काही दिवसांत राज्यातील आणखी काही मंत्र्यांचं बिंग फुटणार असून त्यांनाही राजीनामा द्यावा लागेल असा दावा मनोज कोटक यांनी केला आहे. त्यामुळे आता हे मंत्री कोण असणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप लावले होते. या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. हे संपूर्ण प्रकरण हायकोर्टात गेल्यानंतर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर अनिल देशमुखांनी नैतिकतेच्या आधारे गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी होणार

जबाब नोंदवण्यासाठी सकाळी अकरा वाजता अंधेरीतील डीआयओच्या कार्यालयात हजर राहण्याबाबत त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. रविवारी याचप्रकरणी देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व सहाय्यक एस. कुंदन यांची सुमारे आठ तास चौकशी करून जबाब नोंदविण्यात आले. आता देशमुख यांचा जबाब नोंदवला जाईल. त्यानंतर सीबीआय सोमवारी प्राथमिक चौकशीचा अहवाल  निष्कर्षासह उच्च न्यायालयात सादर करणार आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांनी निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेला दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याच्या केलेल्या आरोपाबाबत १५ दिवसांमध्ये प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून याप्रकरणी चौकशी केली जात आहे.

Web Title: “The coming time is difficult for Anil Deshmukh says BJP MP Manoj Kotak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.