Sanjay Rathod: "खोट्या तक्रारी करून माझे राजकीय जीवन संपविण्याचे षडयंत्र’’, त्या आरोपांना संजय राठोड यांचे प्रत्युत्तर  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 12:31 PM2021-08-13T12:31:50+5:302021-08-13T13:23:32+5:30

Sanjay Rathore News: पूजा चव्हाण आत्महत्या प्रतरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले शिवसेना नेते संजय राठोड हे आता अजून एका महिलेने केलेल्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत.

"Conspiracy to end my political life by making false allegations", Sanjay Rathore responds to those allegations | Sanjay Rathod: "खोट्या तक्रारी करून माझे राजकीय जीवन संपविण्याचे षडयंत्र’’, त्या आरोपांना संजय राठोड यांचे प्रत्युत्तर  

Sanjay Rathod: "खोट्या तक्रारी करून माझे राजकीय जीवन संपविण्याचे षडयंत्र’’, त्या आरोपांना संजय राठोड यांचे प्रत्युत्तर  

googlenewsNext

औरंगाबाद - पूजा चव्हाण आत्महत्या प्रतरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले शिवसेना नेते संजय राठोड हे आता अजून एका महिलेने केलेल्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. (Sanjay Rathore) संजय राठोड यांनी आपल्याकडे शरीरसुखाची मागणी करून लैंगिक छळ केल्याचा आरोप एका महिलेने  दरम्यान, या आरोपांना आता संजय राठोड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खोट्या तक्रारी करून माझे राजकीय जीवन संपविण्याचे षडयंत्र आखण्यात आले आहे. मात्र अशा आरोपाने माझे राजकारण संपणार नाही. या आरोपांची चौकशी करा सत्य समोर येईल, असे संजय राठोड यांनी म्हटले आहे.  ("Conspiracy to end my political life by making false allegations", Sanjay Rathore responds to those allegations)

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी ट्विट करीत संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे खंडन केले.  प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यातील पहूरनजीक शिवपुरी येथे छत्रपती शिवाजी कला शिक्षण विकास कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठान ही संस्था आहे. या संस्थेचा मी सचिव होतो. संस्थेतील तीन शिक्षकांना अनियमिततेच्या कारणावरून २०१७ मध्ये निलंबित करण्यात आले होते. या शिक्षकांनी समाज कल्याण विभागाकडे दाद मागितली. त्यानंतर आयुक्तांकडे प्रकरण गेले. या दोनही ठिकाणी संस्थेच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल झाले आहे. दरम्यानच्या काळात शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपावर तीन शिक्षकांना संस्थेने नियुक्ती दिली. यातील एका शिक्षकाने स्वत:हून राजीनामा दिला. तसे पत्रही संस्थेकडे आहे. हाच शिक्षक पुन्हा संस्थेमध्ये घेण्याची मागणी करीत आहे. यावर न्यायालयाचा जो काही निर्णय येईल त्यानंतर याबाबत ठरवू, असे मी त्याला स्पष्ट केले. मात्र, माझ्यावर तसेच संस्थेवर विविध प्रकारे दबाव आणण्यात येऊ लागला.

दरम्यानच्या काळात फेब्रुवारीतील प्रकरणानंतर माझ्यावर बदनामीकारक आरोप सुरू झाले. विविध पाच निनावी मोबाईल क्रमांकांवरून मला धमक्यांचे फोनही आले. संजय जयस्वाल या संस्थेतील मुख्याध्यापकाला नामसाधर्म्यामुळे धमकीचे मॅसेज प्राप्त झाले. त्यामुळे २४ मे रोजी वडगाव पोलीस ठाण्यात जयस्वाल यांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर तुझे राजकीय अस्तित्व संपवू, असे मॅसेज मला आले. त्यामुळे २७ जुलै रोजी यवतमाळ शहरातील अवधुतवाडी ठाण्यात तक्रार केलेली आहे. याच प्रकरणाचा आता राजकारणासाठी वापर केला जात असल्याचे संजय राठोड म्हणाले. अत्यंत खालच्या थराला जाऊन सध्या राजकारण केले जात आहे. मी आणि माझे कुटुंबीय मागील प्रकरणात कोणत्या मानसिकतेतून गेलो असेल याची कल्पना करावी आणि अशा आरोपाने माझे राजकारण संपणार नाही, असे सांगत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर यावे, अशी माझी स्वत:ची इच्छा आहे. पोलीस अधीक्षकांनाही त्याबाबत सांगितले असल्याचे ते म्हणाले.  खोट्या तक्रारी करून माझे राजकीय जीवन संपविण्याचे षडयंत्र आखण्यात आले आहे. मात्र अशा आरोपाने माझे राजकारण संपणार नाही. या आरोपांची चौकशी करा सत्य समोर येईल, असे आव्हानही त्यांनी दिले.महिलांना पुढे करून सदर प्रकरणाचा आता राजकारणासाठी वापर करण्यात येत आहे, असा आरोपही संजय राठोड यांनी केला.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. बीड जिल्ह्यातील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. त्यानंतर अनेक दिवसांपासून संजय राठोड यांना अटक करा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

Web Title: "Conspiracy to end my political life by making false allegations", Sanjay Rathore responds to those allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.