शिवसेना आमदाराचे वादग्रस्त विधान; म्हणाले, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा धाक दाखवणाऱ्यांविरोधात...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 06:59 PM2021-07-01T18:59:32+5:302021-07-01T18:59:46+5:30

Shiv Sena MLA Sanjay Gaikawad: बुलडाणा जिल्ह्यामध्ये खामगाव तालुक्यात वाघ कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता. पीडित कुटुंबाची भेट घेऊन आज आमदार संजय गायकवाड यांनी या कुटुंबाला धीर दिला. यावेळीच संजय गायकवाड यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत हे विधान केले.

Controversial statement of Shiv Sena MLA Sanjay Gaikawad; Said, The need to teach a lesson to those who fear the Atrocities Act | शिवसेना आमदाराचे वादग्रस्त विधान; म्हणाले, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा धाक दाखवणाऱ्यांविरोधात...

शिवसेना आमदाराचे वादग्रस्त विधान; म्हणाले, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा धाक दाखवणाऱ्यांविरोधात...

googlenewsNext

बुलडाणा - अ‍ॅट्रॉसिटी कायदा हा रक्षणासाठी आहे. मात्र त्याचा वापर हा ब्लॅकमेलिंगसाठी केला जात आहे. अ‍ॅट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. असा धाक दाखवून कुणी हल्ल्याचा प्रकार पुन्हा केला तर मी स्वत: १० हजारांची फौज घेऊन येईन आणि संबंधितांना सरळ करेन, असे विधान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बुलडाणा जिल्ह्यामध्ये खामगाव तालुक्यात वाघ कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा धाक दाखवून रमेश हिवराळे उर्फ पोत्या नावाच्या गुंडाने हा हल्ला केला होता. दरम्यान, पीडित कुटुंबाची भेट घेऊन आज आमदार संजय गायकवाड यांनी या कुटुंबाला धीर दिला. यावेळीच संजय गायकवाड यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत हे विधान केले.

ते म्हणाले की, हा हल्ला बिहार आणि उत्तर प्रदेशला लाजवणारा आहे.  अ‍ॅट्रॉसिटी कायदा हा रक्षणासाठी केलेला कायदा आहे. मात्र या कायद्याचा वापर ब्लॅकमेलिंग करण्यासाठी केला जात आहे. या कायद्याचा धाक दाखवून पैसे उकळले जात आहेत. या ठिकाणी अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालत आहेत. त्यात एका समाजाची संख्या कमी असल्याने त्यांच्यावर वारंवार हल्ला झाल्याच्या घटना घडतात. याआधी एका प्रकरणात आत्महत्या केलेल्या तरुणाच्या खिशात चिठ्ठी सापडल्यावरही कारवाई झाली नाही. त्यामुळे पोत्याची दहशत निर्माण झाली, असे गायकवाड म्हणाले.

दरम्यान, अन्याय झाल्याच प्रतिकार करा, असा सल्लाही गायकवाड यांनी पीडितांना दिला. कुणी अन्याय करत असेल तर आसपासच्या तरुणांचे पथक बनवा. वेळ आल्यास तुटून पडा. अ‍ॅट्रॉसिटीचा धाक कुणी दाखवत असेल तर तुम्हीही त्याच्याविरोधात दरोड्याची तक्रार द्या. यापुढे येथे असा हल्ला झाला तर मी स्वत: १० हजारांची फौज घेऊन येईन आणि सगळ्यांना एका फटक्यात सरळ करेन, असा इशाराही संजय गायकवाड यांनी दिला. 

Web Title: Controversial statement of Shiv Sena MLA Sanjay Gaikawad; Said, The need to teach a lesson to those who fear the Atrocities Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.