नरेंद्र मोदींच्या एका फोटोमुळे ब्रिटनच्या संसदेमध्ये वाद, नेमकं काय आहेत त्या फोटोत? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 09:06 PM2021-07-16T21:06:08+5:302021-07-16T21:07:13+5:30

Photo of Narendra Modi: ब्रिटनमध्ये सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या एकत्रित फोटोवरून वादंग उठला आहे.

Controversy in the British Parliament over a photo of Narendra Modi, what exactly is in that photo? | नरेंद्र मोदींच्या एका फोटोमुळे ब्रिटनच्या संसदेमध्ये वाद, नेमकं काय आहेत त्या फोटोत? 

नरेंद्र मोदींच्या एका फोटोमुळे ब्रिटनच्या संसदेमध्ये वाद, नेमकं काय आहेत त्या फोटोत? 

Next

लंडन - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध देशांसोबत मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असतात. तसेच त्यासाठी ते विविध राष्ट्रांच्या प्रमुखांसोबत आपली खास मैत्री असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र ब्रिटनमध्ये सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या एकत्रित फोटोवरून वादंग उठला आहे. ब्रिटनमधील विरोधी पक्षाने पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या सामुग्रीत मोदी आणि जॉन्सन यांचा एकत्र फोटो छापून त्याखाली छापलेल्या मजकुरामुळे ही बाब भारतविरोधी असल्याचे सांगत त्याचा विरोध करण्यात आला आहे.  ( Controversy in the British Parliament over a photo of Narendra Modi, what exactly is in that photo?)

ब्रिटनमधील विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाने हे पत्रक छापले होते. त्यामध्ये मोदी आणि बोरिस जॉन्सन यांचा एकत्र फोटो होता. त्याखाली लिहिले होते की,  “Don’t risk a Tory MP who is not on your side” म्हणजेच टोरी खासदाराला निवडून देण्याचा धोका पत्करू नका. ती तुमची बाजू नाही आहे. मोदी आणि बोरिस जॉन्सन हे मित्र आहेत. त्यामुळे जॉन्सन यांच्या पक्षाला मत देऊ नका, असे या फोटोच्या माध्यमातून सूचवण्याचा प्रयत्न होता. दरम्यान बहुतांस भारती वंशाच्या नागरिकांनी हा प्रकार भारतविरोधी असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, मोदी आणि बोरिस जॉन्सन यांच्यातील या फोटोवरून सुरू झालेला वाद ब्रिटनच्या संसदेपर्यंत पोहोचला आहे. बोरिस जॉन्सन यांनी हा प्रकार वर्णद्वेषी असल्याचे सांगत विरोधी पक्षाने हा फोटो निवडणुकीच्या सामुग्रीमधून मागे घ्यावा असे आवाहन केले आहे. मोदी आणि जॉन्सन यांचा हा फोटो २०१९ मध्ये झालेल्या जी-७ संमेलनामधील आहे. त्यामध्ये दोन्ही देशांचे पंतप्रधान हस्तांदोलन करताना दिसत आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या प्रचारात लेबर पार्टीने नकारात्मक प्रचार केल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ही पोटनिवडणूक उत्तर इंग्लंडमधील बेटले अँड स्पेन सीटवर झाली होतीय या पोटनिवडणुकील मजूर पक्षाने विजय मिळवला होता. तसेच मजूर पक्षाने प्रचार सामुग्रीतील पत्रावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा फोटो छापला होता. तसेच टोरी खासदाराला निवडून देण्याची जोखीम पत्करू नका, असे म्हटले होते. सत्ताधारी हुजूर पक्षाच्या खासदारांना टोरी म्हटले जाते. दरम्यान, ज्या ठिकाणी ही पोटनिवडणूक होती तिथे शीख मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुले त्यांना आपल्या बाजूने करून घेण्यासाठी हा हातखंडा वापरला गेला. दरम्यान, ही प्रचार सामुग्री तयार झाली असतानाच तिचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. तसेच मजूर पक्षातील अनेक खासदारांनीही या सामुग्रीला विरोध केला होता.  

Web Title: Controversy in the British Parliament over a photo of Narendra Modi, what exactly is in that photo?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.