Corona Vaccine Shortage: महाराष्ट्राने 5 लाख डोस वाया घालवले, असे कसे चालेल? प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 04:18 PM2021-04-08T16:18:21+5:302021-04-08T16:34:22+5:30

Prakash Javdekar told Maharashtra has 23 lakhs corona vaccine today: राज्यात अनेक जिल्ह्यांत कोरोना लस नसल्याने लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. यावरून गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरु झाला आहे. एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप होत आहेत.

Corona Vaccination: 5 lakh corona doses wasted by Maharashtra Government; Prakash Javadekar questions Thackeray government | Corona Vaccine Shortage: महाराष्ट्राने 5 लाख डोस वाया घालवले, असे कसे चालेल? प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप

Corona Vaccine Shortage: महाराष्ट्राने 5 लाख डोस वाया घालवले, असे कसे चालेल? प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप

googlenewsNext

महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरापासून खूप विचित्र घटना घडू लागल्या आहेत. शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackreay) आणि त्यांचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) सचिन वाझेला (Sachin Vaze) अटक झाली तेव्हा त्याची बाजू मांडत होते. त्याला वाचवत होते. शिवसेनेने भाजपाच्या, मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले आणि नंतर गद्दारी करत राष्ट्रवादी, काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही अशी टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. यानंतर जावडेकरांनी राज्यातील कोरोना लसीच्या तुटवड्यावर भाष्य केले. (No Corona Vaccine Shortage in Maharashtra, Prakash javdekar says lack of Management in Maharashtra Government.)


महाराष्ट्रात 23 लाख डोसेस आहेत. दिवसाला जेवढे डोस द्याल त्यापेक्षा जास्त डोस दुसऱ्यादिवशी दिले जातात. आता हे डोस जिल्ह्यांना पाठविणे, तेथून तहसील आणि तहसीलवरून  तालुक्यांच्या सरकारी, खासगी हॉस्पिटलला पाठविणे हे काही केंद्र सरकारचे काम नाहीय. ते राज्य सरकारचे आहे. त्यांची जबाबदारी आहे. केंद्र सरकार राज्यांच्या क्षमतेनुसार त्यापेक्षा आजच्यापेक्षा जास्त कोटा देते, असे जावडेकर म्हणाले. 


महाराष्ट्रात 5 लाख डोस खराब केले. कारण त्यांना नियोजनच करण्यात आले नाही. एक व्हायलमध्ये दहा डोस असतात. चार-पाच लोक आले त्यांना डोस दिला बाकीचा खराब झाला. असे कसे चालेल. तुम्हाला त्याचे नियोजन करावे लागेल. राज्य सरकार आपले काम ठीक करत नसून दुसऱ्यांना दोष देत आहे. मी महाराष्ट्राची पूर्ण माहिती घेतली आहे. तुम्ही अन्य राज्यांची माहिती घ्यावी. राज्यात सध्या 5 ते 6 दिवसांची लस शिल्लक असल्याचे जावडेकर म्हणाले. 


राज्यात अनेक जिल्ह्यांत कोरोना लस नसल्याने लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. यावरून गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरु झाला आहे. एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप होत आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रावर महाराष्ट्राला मुद्दामहून लस दिली जात नसल्याचा आरोप केला आहे. तसेच अन्य राज्यांना महाराष्ट्रापेक्षा जास्त लस दिली जात असल्याचा आरोप झाला आहे. तर केंद्राकडून महाराष्ट्रात लसीचा तुटवडा नसल्याचे प्रत्यूत्तर दिले जात आहे. 

 

Web Title: Corona Vaccination: 5 lakh corona doses wasted by Maharashtra Government; Prakash Javadekar questions Thackeray government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.