corona vaccination : "मोदी सरकराची नियोजनाविनाच घोषणा; पण लसच नाही, मग लसीकरण कसं होणार? ’’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 01:48 PM2021-04-30T13:48:33+5:302021-04-30T13:50:33+5:30

corona vaccination in India : १८ चे ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणावरून उडालेल्या गोंधळावरून राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

corona vaccination: '' Modi government's announcement without planning; But there is no vaccine, so how can there be vaccination? "Nawab Malik's question mark on central government's vaccination campaign | corona vaccination : "मोदी सरकराची नियोजनाविनाच घोषणा; पण लसच नाही, मग लसीकरण कसं होणार? ’’

corona vaccination : "मोदी सरकराची नियोजनाविनाच घोषणा; पण लसच नाही, मग लसीकरण कसं होणार? ’’

Next
ठळक मुद्देदेशात कोरोनाशी लढण्यात मोदी सरकार अपयशी सरकारकडून नियोजनाशिवाय घोषणा होत आहेत. राज्यांना लसी पुरवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहेकेंद्र सरकारने उद्यापासून लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. मात्र लसच उपलब्ध नाही आहे. मग लसीकरण होणार कुठून

मुंबई - देशात मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १ मेपासून देशातील १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील लस देण्याची घोषणा केली होती. (corona vaccination in India) मात्र प्रत्यक्षात लसीचा तुटवडा असल्याने आता देशातील अनेक राज्यांमध्ये १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरवात होणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. (Coronavirus in India) दरम्यान, १८ चे ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणावरून उडालेल्या गोंधळावरून राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ( '' Modi government's announcement without planning; But there is no vaccine, so how can there be vaccination? "Nawab Malik's question mark on central government's Corona vaccination campaign)

देशातील वाढत असलेले कोरोनाचा फैलाव आणि फसलेल्या लसीकरणाच्या नियोजनावरून नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणतात की, देशात कोरोनाशी लढण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. सरकारकडून नियोजनाशिवाय घोषणा होत आहेत. राज्यांना लसी पुरवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने उद्यापासून लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. मात्र लसच उपलब्ध नाही आहे. मग लसीकरण होणार कुठून, याचं उत्तर मोदी सरकारला द्यावं लागेल, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे.   

 देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या आठवड्याभरपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे देशाच्या अनेक राज्यांमधील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. तर दुसऱ्या बाजूला कोरोना लसीकरण मोहिमेतही अनेक अडथळे येत आहेत. केंद्र सरकारनं १ मेपासून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. मात्र पुरेशा तयारीअभावी केलेली ही घोषणा आता कागदावरच राहण्याची दाट शक्यता आहे.  

Web Title: corona vaccination: '' Modi government's announcement without planning; But there is no vaccine, so how can there be vaccination? "Nawab Malik's question mark on central government's vaccination campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.