कोरोनाची लस नेत्यांना प्राधान्याने मिळावी; शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 03:24 AM2020-12-03T03:24:46+5:302020-12-03T07:35:07+5:30

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून आजतागायत त्यात्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रकारची विम्याची सुरक्षा नसताना आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करीत आहेत.

Corona vaccine should be given priority to leaders; Strange demand of Shiv Sena leader by writing a letter to the Chief Minister | कोरोनाची लस नेत्यांना प्राधान्याने मिळावी; शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी

कोरोनाची लस नेत्यांना प्राधान्याने मिळावी; शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी

Next

ठाणे : कोरोना महामारीचे संकट आल्यापासून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सर्वच स्तरांतून अथक परिश्रम करण्यात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी तसेच आमदार, खासदार यांनीही आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची अहोरात्र सेवा केली असून काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे लसीचा प्राधान्यक्रम ठरविताना लोकप्रतिनिधींचादेखील अग्रकमाने समावेश करण्याची मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.   

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून आजतागायत त्यात्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रकारची विम्याची सुरक्षा नसताना आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करीत आहेत. ठाण्याचे नगरसेवक मुकुंद केणी, विलास कांबळे, कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर राजेंद्र देवळेकर, नगरसेवक दशरथ घाडीगावकर, मीरा-भाईंदरचे नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर, पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवक दत्ता साने यासह मुंबई, वसई-विरार या परिसरात कोरोनायोद्धे म्हणून काम करणाऱ्या नगरसेवकांचा यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक लोकप्रतिनिधी कोविडबाधित झाले. त्यातून बरे झाल्यानंतर ते पुन्हा जनतेची सेवा करीत आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा करणे, आरोग्य यंत्रणा व सुविधा उपलब्ध करून देणे, रुग्ण्वाहिका उपलब्ध करून देणे, रुग्णांना ॲडमिट करणे, कंटेनमेंट झोन निश्चित झाल्यानंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे, सतत पालिका आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधणे, आजाराबाबत जनजागृती करणे, वेळप्रसंगी कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांना भेटून दिलासा देणे, आवश्यक मदत देणे अशा असंख्य कामांमध्ये नगरसेवकांनी योगदान दिले आहे. त्यामुळे लस वितरणाचा प्राधान्यक्रम ठरवताना लोकप्रतिनिधींचाही अग्रक्रमाने समावेश करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Corona vaccine should be given priority to leaders; Strange demand of Shiv Sena leader by writing a letter to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.