Coronavirus: लॉकडाऊन निषेधार्थ खासदार छत्रपती उदयनराजे कटोरा घेऊन रस्त्यावर बसले, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 03:01 PM2021-04-10T15:01:42+5:302021-04-10T15:05:28+5:30

BJP MP Chhatrapati Udayanraje Bhosale agitation against Lockdown: राज्य शासनात जी तज्ज्ञ मंडळी बसली आहेत, ती तज्ज्ञ वाटत नाहीत. मी व्यापारी असतो तर दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलीय

Coronavirus: BJP MP Chhatrapati Udayanraje on the road to protest lockdown imposed by Government. | Coronavirus: लॉकडाऊन निषेधार्थ खासदार छत्रपती उदयनराजे कटोरा घेऊन रस्त्यावर बसले, अन्...

Coronavirus: लॉकडाऊन निषेधार्थ खासदार छत्रपती उदयनराजे कटोरा घेऊन रस्त्यावर बसले, अन्...

Next
ठळक मुद्देकोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन पर्याय असू शकत नाही. लोकं ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.उद्यापासून नो लॉकडाऊन जर संघर्ष झाला तर त्याची जबाबदारी तुमची असेल भीक मांगो आंदोलनात जमा केलेले ४५० रुपये घेऊन खासदार उदयनराजेंनी चालत थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं

सातारा – राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनविरोधात भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विरोध केला. साताऱ्यातील पोवई नाका येथे उदयनराजेंनी चक्क कटोरा घेऊन रस्त्यावर भीक मांगो आंदोलन केले. यावेळी विविध विषयावरून उदयनराजेंनी ठाकरे सरकारवर जोरदार घणाघात केला.

उदयनराजे म्हणाले की, राज्य शासनात जी तज्ज्ञ मंडळी बसली आहेत, ती तज्ज्ञ वाटत नाहीत. मी व्यापारी असतो तर दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलीय, कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन पर्याय असू शकत नाही. लोकं ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. सणासुदीचे दिवस आल्याने व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला आहे. बँकेचे हप्ते भरायचे आहेत, उद्यापासून नो लॉकडाऊन जर संघर्ष झाला तर त्याची जबाबदारी तुमची असेल असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला.

यावेळी भीक मांगो आंदोलनात जमा केलेले ४५० रुपये घेऊन खासदार उदयनराजेंनी चालत थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. राज्य सरकारनं लॉकडाऊनचा पुनर्विचार करावा अशी मागणी त्यांनी केली. तसेच मी दुकानदार अथवा व्यापाऱ्यांच्या बाजूने बोलत नाही तर सर्वसामान्यांच्या बाजूने बोलतोय. तुम्ही सगळं बंद करून उपासमारीची वेळ आणली आहे. आज जी परिस्थिती आली आहे त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात, तुमचे काळे कारनामे लपवण्यासाठीच लॉकडाऊन केलाय अशी टीकाही खासदार उदयनराजेंनी ठाकरे सरकारवर केली. एकीकडे खासदार उदयनराजे सरकारविरोधात आंदोलन करून रस्त्यावर कटोरा घेऊन दिसले तर दुसरीकडे सातारचे खासदार श्रीनिवास पाटील लॉकडाऊनमधील वेळ सत्कारणी लावत शेतात काम करत असल्याचा फोटो व्हायरल झाला.

काय म्हणाले होते उदयनराजे?

कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्य माणसांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर लॅाकडाऊन सारखी परिस्थिती कायम राहणार असेल तर या दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करून जनतेला किमान दिलासा द्यावा. अन्यथा जनतेत उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशारा भाजपाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.    

Read in English

Web Title: Coronavirus: BJP MP Chhatrapati Udayanraje on the road to protest lockdown imposed by Government.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.