Coronavirus: कोरोना काळात लोकांमध्ये जाऊन ठळकपणे काम करा, राज्यांतील नेते, कार्यकर्त्यांना भाजपच्या नेतृत्वाचा स्पष्टपणे सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 08:43 AM2021-05-24T08:43:42+5:302021-05-24T08:44:08+5:30
Coronavirus: पक्ष नेत्यांनी गरजूंना औषधी, रुग्णालयांत खाटांची उपलब्धता, काम करणारे मॉनिटर, आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधा खात्रीने मिळाव्यात म्हणून ‘सामाजिक उपक्रम’ वाढविण्यास कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर पक्षाची ठळकपणे जाणवलेली अनुपस्थिती आणि जनतेच्या उघडपणे व्यक्त न झालेल्या, पण तीव्र भावनांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेतृत्वाने राज्या-राज्यांतील आपले नेते व कार्यकर्त्यांना लोकांमध्ये जाऊन अगदी स्पष्टपणे व सहानुभूतीपूर्वक काम करण्यास सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्ष नेत्यांनी गरजूंना औषधी, रुग्णालयांत खाटांची उपलब्धता, काम करणारे मॉनिटर, आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधा खात्रीने मिळाव्यात म्हणून ‘सामाजिक उपक्रम’ वाढविण्यास कार्यकर्त्यांना सांगितले आहे. या पायाभूत सुविधांमध्ये सरकारी रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांटस उभारण्याचाही समावेश आहे.
भाजप आणि सरकार यांच्याबद्दल नकारात्मक कथन केले जात आहे हे खरे, असे भाजपच्या नेत्याने मान्य केले. परिस्थिती जेव्हा सामान्य बनेल तेव्हा आम्ही त्या कथनाला उत्तर देऊ शकू. आताची वेळ ही अनेकांनी त्यांच्या कुटुंबातील जीवलग गमावलेले आहेत. आम्ही त्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्याची आहे. त्यांच्या अडचणी दूर करून त्यांच्यासोबत उभे राहण्याची आहे. राज्यांतील पक्ष नेते, तसेच कार्यकर्ते यांना त्यांनी लोकांमध्ये जाऊन प्रभावीपणे आणि सहानुभूतीपूर्वक काम करावे, असे सांगण्यात आले आहे, असे हा नेता म्हणाला.
ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट पसरत चालली असताना काँग्रेस सरकारची प्रतिमा कलंकित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप भाजप करीत असताना पक्ष नेत्यांना लोकांमध्ये जाण्यास सांगण्यात आले आहे.