coronavirus: "हा तर मोदी सरकारचा धूर्तपणा; देवेंद्र फडणवीसजी कृपया खोटे बोलणे थांबवा’’  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 05:41 PM2021-04-26T17:41:28+5:302021-04-26T17:43:36+5:30

coronavirus in Maharashtra : काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आकडेवारी मांडून फडणवीस यांच्या दाव्याची चिरफाड करत मोदी सरकारलाही टोला लगावला आहे.

coronavirus: ''This is the cunning of the Modi government; Devendra Fadnavis, please stop lying. " Sachin Sawant Criticize Devendra Fadanvis | coronavirus: "हा तर मोदी सरकारचा धूर्तपणा; देवेंद्र फडणवीसजी कृपया खोटे बोलणे थांबवा’’  

coronavirus: "हा तर मोदी सरकारचा धूर्तपणा; देवेंद्र फडणवीसजी कृपया खोटे बोलणे थांबवा’’  

Next

मुंबई - कोरोना विषाणूच्या थैमानामुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. मेडिकल ऑक्सिजनसह विविध औषधांचा तुटवडा जाणवत आहे. (coronavirus in Maharashtra) त्यादरम्यान, केंद्र सरकारने राज्याला पुरवलेल्या ऑक्सिजनसाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. मात्र आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आकडेवारी मांडून फडणवीस यांच्या या दाव्याची चिरफाड करत मोदी सरकारलाही टोला लगावला आहे. (' This is the cunning of the Modi government; Devendra Fadnavis, please stop lying. " Sachin Sawant Criticize Devendra Fadanvis)

सचिन सावंत यांनी एकापाठोपाठ एक असे तीन ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याची पोलखोल केली आहे. या ट्विटमध्ये सचिन सावंत म्हणतात. प्रिय देवेंद्र फडणवीसजी आपण जी यादी दाखवून मोदींना श्रेय देत आहात, त्यामध्ये महाराष्ट्रात असलेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. १२५० मे.टन ही महाराष्ट्राची निर्माण क्षमता आहे. यासाठी मोदींच्या परवानगीची गरज नाही. त्याबद्दल त्यांचे आभार मानणे योग्य नाही. हा मोदी सरकारचा धूर्तपणा आहे.

त्यानंतर सावंत यांनी याबाबतची आकडेवारीही मांडली आहे. महाराष्ट्रातील प्रकल्पाद्वारे महाराष्ट्राची ऑक्सिजन उत्पादन क्षमता ही १२५० मे.टन आहे. तर केंद्राच्या मान्यतेने भिलाई येथून ११० मेट्रिक टन, बेलारी येथून ५० मेट्रिक टन, जामनगर येथून १२५ मेट्रिक टन, विझाग येथून ६० मेट्रिक टन आणि ऑक्सिजन एक्स्प्रेसने ७ टॅँकरमधून एकदा ११० मेट्रिक ऑक्सिजन आणले आहे, अशी आकडेवारीच सचिन सावंत यांनी दिली आहे. 

 महाविकास आघाडी सरकारने १५ ते ३० एप्रिल या १५ दिवसांसाठी २५ हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासेल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामध्ये १७ हजार ५०० मेट्रिक टन  ऑक्सिजन निर्मिती करण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे. तर केंद्राकडून ७ हजार ५०० मेट्रिक टन म्हणजे दररोज ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात केंद्राकडून केवळ ३४५ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळत आहे. उरलेल्या पुरवठ्यासाठी वाहतुकीचे अडथळे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसजी कृपया खोटे बोलणे थांबवा, असा टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे.   

Web Title: coronavirus: ''This is the cunning of the Modi government; Devendra Fadnavis, please stop lying. " Sachin Sawant Criticize Devendra Fadanvis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.