coronavirus: "इंजेक्शन चोर भाजपा नेते आणि ब्रूक फार्मा कंपनीवर तात्काळ खटला दाखल करा’’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 05:01 PM2021-04-20T17:01:32+5:302021-04-20T17:06:37+5:30
Remdesivir injection case : राज्यात सध्या गाजत असलेल्या रेमडेसिविर प्रकरणामध्ये आता काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्याची बंदी असताना औषध खाजगीरीत्या कशी वाटली? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.
मुंबई - राज्यात सध्या गाजत असलेल्या रेमडेसिविर प्रकरणामध्ये आता काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. () राज्याची बंदी असताना औषध खाजगीरीत्या कशी वाटली? (Remdesivir injection case ) असा सवाल उपस्थित करत इंजेक्शन चोर भाजपा नेते आणि ब्रूक फार्मा कंपनीवर तात्काळ खटला दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. (immediately file case against injection thief BJP leader and Brooke Pharma Company, congress demands )
याबाबत केलेल्या ट्विटमध्ये सचिन सावंत म्हणाले की, इंजेक्शन चोर भाजपा नेते आणि ब्रूक फार्मा कंपनीवर तात्काळ खटला दाखल करावा. ८ एप्रिल व १२ एप्रिल रोजी भाजपाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अंमळनेर व नंदुरबार ला हजारो रेमडेसीवीर इंजेक्शन वाटले. हा साठा पूर्णपणे निर्यातीसाठी होता. राज्याची बंदी असताना औषध खाजगीरीत्या कशी वाटली? असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला.
इंजेक्शन चोर भाजपा नेते आणि ब्रूक फार्मा कंपनीवर तात्काळ खटला दाखल करावा. ८ एप्रिल व १२ एप्रिल रोजी भाजपाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अंमळनेर व नंदुरबार ला हजारो रेमडेसीवीर इंजेक्शन वाटले. हा साठा पूर्णपणे निर्यातीसाठी होता. राज्याची बंदी असताना औषध खाजगी रित्या कशी वाटली? pic.twitter.com/2ESparDAeS
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 20, 2021
ब्रूक फार्मा कंपनी म्हणते दमण प्रशासनाने तिला महाराष्ट्रात वितरण करण्यास परवानगी दिली नाही, मग महाराष्ट्रात हा साठा आला कसा? फडणवीस व दरेकर यांना मार्ग दाखविणारे शिरीष चौधरी, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्याबरोबर दमणला गेले होते. लोकांकडून अनधिकृत पणे पैसे घेतले गेले. हे भयानक आहे, असेही सचिन सावंत म्हणाले.
ब्रूक फार्मा कंपनी म्हणते दमण प्रशासनाने तीला महाराष्ट्रात वितरण करण्यास परवानगी दिली नाही मग महाराष्ट्रात हा साठा आला कसा? फडणवीस व दरेकर यांना मार्ग दाखविणारे शिरीष चौधरी दरेकर व लाड यांच्या बरोबर दमणला गेले होते. लोकांकडून अनधिकृत पणे पैसे घेतले गेले.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 20, 2021
हे भयानक आहे. pic.twitter.com/hHMcXLz6nN
दरम्यान, मुंबईत रेमडेसिविरवरून ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांवर केलेल्या कारवाईचेही सचिन सावंत यांनी समर्थन केले आहे. डीसीपी मंजूनाथ सिंगे यांनी योग्य कारवाई केली होती. भाजपा नेत्यांचे व ब्रूक फार्मा कंपनीचे रेमडेसीवीरच्या काळाबाजारात संगनमत होते. तात्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
डीसीपी मंजूनाथ सिंगे यांनी योग्य कारवाई केली होती. भाजपा नेत्यांचे व ब्रूक फार्मा कंपनीचे रेमडेसीवीरच्या काळाबाजारात संगनमत होते. तात्काळ कारवाई झाली पाहिजे. pic.twitter.com/4Js8vC8iGt
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 20, 2021