CoronaVirus Live Updates : "विरोधी पक्षाने कोरोनाबद्दल लोकांमध्ये भीती निर्माण केलीय पण..."; योगी आदित्यनाथांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 08:01 PM2021-05-17T20:01:54+5:302021-05-17T20:17:56+5:30
Corona Virus And Yogi Adityanath : कोरोनाचं संकट असताना विरोधी पक्ष लोकांना भडकवत आहेत असा गंभीर आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,49,65,463 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,81,386 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,106 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,74,390 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील कोरोनाचा कहर (CoronaVirus) पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीची जिल्ह्यांनुसार तपासणी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) अनेक जिल्ह्यांना भेट देत आहेत. सोमवारी मुझफ्फरनगरमध्ये त्यांनी कोरोना नियंत्रण कक्षापासून आरोग्य विभागाने केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
कोरोनाचं संकट असताना विरोधी पक्ष लोकांना भडकवत आहेत असा गंभीर आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. कोरोना काळात लोकांना धीर देणं आणि त्यांची हिंमत वाढवण्याची गरज आहे त्यावेळेस विरोधी पक्षातील नेते लोकांना घाबरवण्याचं काम करत आहेत अशा शब्दांत योगींनी निशाणा साधला आहे. रोगाच्या कालावधीमध्ये काही लोकांनी जनतेला धीर देऊन त्यांचा विश्वास वाढवण्याची गरज होती त्यावेळी त्यांनी जनतेला भडकवण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला. विरोधी पक्षांनी भीती दाखवल्यामुळे लोक ऑक्सिजनसाठी धावपळ करू लागले आणि सर्वजण घाबरुन गेले, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
CoronaVirus Live Updates : "कोरोना मृतांची संख्या लपवण्यासाठी योगी सरकार मृतदेह नदीत टाकून देतेय"#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#YogiAdityanath#UttarPradesh#BJPhttps://t.co/u3E5stKeMLpic.twitter.com/xrRNtjxtEA
— Lokmat (@MiLOKMAT) May 13, 2021
उत्तर प्रदेशमध्ये 300 ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचं काम आम्ही करत आहोत. मुझफ्फरनगरमध्येही सहा ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यात येणार आहेत. येथे चार प्लान्ट आधीपासूनच कार्यरत आहेत अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारने तयारी सुरू केल्याची माहिती दिली. आम्ही आतापासूनच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयारी सुरू केली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना प्रादुर्भाव होऊ शकतो अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र सर्वांनी या परिस्थितीमध्ये धीर धरणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले आहेत.
CoronaVirus Live Updates : "कोरोनाच्या संकटात अधिकाऱ्यांकडूनच सहकार्य मिळत नाही, टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव टाकताहेत"#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#YogiAdityanath#Doctor#UttarPradeshhttps://t.co/1CryOTAezipic.twitter.com/Fc7Opnx5VX
— Lokmat (@MiLOKMAT) May 13, 2021
योगी आदित्यनाथ यांनी देशामध्ये सर्वाधिक कोरोना चाचण्या करणाऱ्या राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेश अव्वल असल्याचं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये साडेचार कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. गावांमध्येही ट्रेस, टेस्ट आणि ट्रीटमेंट या पद्धतीने काम सुरू आहे. लसीकरणही मोठ्या संख्येनेही सुरू करण्यात आलं आहे. आतापर्यंत दीड कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. राज्यामध्ये प्रादुर्भाव कमी होत आहे, असं योगी म्हणाले. तसेच समाजातील गरीब घटकांसाठी कम्युनिटी किचनची सेवा सुरू करण्यात आली आहे. गरीबांना मोफत धान्य देण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus Live Updates : "मोदींनी उशिराने लशींची ऑर्डर दिली, पारदर्शकता नाही...हा धोरण लकवा"; असदुद्दीन ओवैसी गंभीर आरोप#CoronavirusIndia#coronavirus#CoronaVaccine#CoronaVaccination#VaccineShortage#AsaduddinOwaisi#NarendraModihttps://t.co/EC9CmLgeeapic.twitter.com/BuAGKKx2r3
— Lokmat (@MiLOKMAT) May 14, 2021