Coronavirus: ”कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं”; ठाकरे सरकारवर भाजपाची फिल्मीस्टाईल टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 01:43 PM2021-04-07T13:43:41+5:302021-04-07T13:45:10+5:30

पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात बाजारपेठा, दुकाने बंद केल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. महाविकास आघाडी सरकारला  कठोर निर्बंध लावायचे आहेत की लॉकडाऊन असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  

Coronavirus Lockdown Maharashtra: BJP Keshav Updhye criticism on Thackeray government | Coronavirus: ”कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं”; ठाकरे सरकारवर भाजपाची फिल्मीस्टाईल टीका

Coronavirus: ”कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं”; ठाकरे सरकारवर भाजपाची फिल्मीस्टाईल टीका

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यावरील हे संकट टळण्यासाठी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून सरकारला साथ देण्यास भाजपा तयार आहेरविवारी आपला निर्णय जाहीर करून मुख्यमंत्री ‘मातोश्री’त बसले आहेत. या संकट काळात जनतेचे काय हा साधा प्रश्नही त्यांना पडत नसावा काय?कठिण काळात सरकारने वीज बिलांची वसूली थांबवण्याचा निर्णय घेणे अपेक्षित होते मात्र सरकारने त्याकडेही दुर्लक्ष केले आहे.

मुंबई - कोरोनाच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी निर्बंध लावण्याच्या नावाखाली राज्य सरकारने  लॉकडाऊन लावत जनतेची घोर फसवणूक केली आहे. रोज बदलणारे नियम ,मंत्र्यांची परस्पर विरोधी विधाने पाहता राज्य सरकारची  परिस्थिती ”कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं” अशी झाली आहे अशा टोला भाजपाचे  मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. (BJP Target Thackeray Government over Coronavirus Lockdown situation in Maharashtra)

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपाध्ये म्हणाले की, राज्यात  कठोर निर्बंध लावले जाणार असून केवळ आठवड्याच्या अखेरीस शनिवारी, रविवारी पूर्ण लॉकडाऊन असेल असे सरकारमधील चार-चार मंत्र्यांनी विविध वृत्तवाहिन्यावर सांगितले होते. जनतेच्या हिताचा सारासार विचार करून हा निर्णय घेतला असल्याचेही या मंत्र्यांनी आवर्जून सांगितले होते. मात्र, मंगळवारी राज्यभरातली गोंधळाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने विरोधी पक्षांसह जनतेची सुद्धा फसवणूक केल्याचे दिसून आले. पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात बाजारपेठा, दुकाने बंद केल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. महाविकास आघाडी सरकारला  कठोर निर्बंध लावायचे आहेत की लॉकडाऊन असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  

त्याचसोबत राज्यावरील हे संकट टळण्यासाठी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून सरकारला साथ देण्यास भाजपा तयार आहे मात्र, सरकारने सामान्य, गोरगरीब, कष्टकरी वर्गाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने या वर्गाला आर्थिक मदत द्यावी असे भाजपाने सुचवले होते. मात्र, रविवारी आपला निर्णय जाहीर करून मुख्यमंत्री ‘मातोश्री’त बसले आहेत. या संकट काळात जनतेचे काय हा साधा प्रश्नही त्यांना पडत नसावा काय? सरकार एवढे निर्दयी कसे असू शकते? असा घणाघात भाजपाने सरकारवर केला आहे.

दरम्यान, राज्यातले अर्थचक्र गतिमान करण्याच्या गप्पा मारणाऱ्या या वसुली सरकारने अप्रत्यक्ष लॉकडाऊन लावून अर्थव्यवस्थेचे चक्र पूर्णत: ठप्प केले आहे. तसेच या कठिण काळात सरकारने वीज बिलांची वसूली थांबवण्याचा निर्णय घेणे अपेक्षित होते मात्र सरकारने त्याकडेही दुर्लक्ष केले आहे. केवळ जनतेची पिळवणूक हेच या सरकारचे धोरण आहे हे आता स्पष्ट होते असंही केशव उपाध्ये म्हणाले.

संघनिष्ठ शोधण्याऐवजी वाझे शोधा

नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील(Dilip Walse Patil) यांनी गृहखात्याचा कारभार स्वीकारताच गृह खात्यातील संघनिष्ठ अधिकारी शोधण्याचे जाहीर केले. संघ देश प्रेम शिकवतो. संघनिष्ठ अधिकारी शोधण्यास वेळ घालविण्यापेक्षा विविध खात्यात भ्रष्ट व्यवहार करणारे जे ‘वाझे’ अद्याप दडलेले आहेत त्यांना शोधून काढावे, ते महाराष्ट्राच्या हिताचे आहे असं सांगत उपाध्ये यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना टोला लगावला

Web Title: Coronavirus Lockdown Maharashtra: BJP Keshav Updhye criticism on Thackeray government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.