Coronavirus: एन. डी. पाटील यांनी केली कोरोनावर मात; ९२ व्या वर्षी उपचारांना प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 06:38 AM2021-05-17T06:38:58+5:302021-05-17T06:39:28+5:30

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील हे सध्या वयपरत्वे आलेल्या आजारपणामुळे रुईकर कॉलनीतील घरीच उपचार घेत आहेत

Coronavirus: N. D. Patil defeats Corona; 92 years of response to treatment | Coronavirus: एन. डी. पाटील यांनी केली कोरोनावर मात; ९२ व्या वर्षी उपचारांना प्रतिसाद

Coronavirus: एन. डी. पाटील यांनी केली कोरोनावर मात; ९२ व्या वर्षी उपचारांना प्रतिसाद

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत, लढाऊ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी ९२ व्या वर्षी कोरोनावर मात केली आहे. त्यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीसमोर कोरोनानेही हार मानली आणि दहा दिवसांच्या यशस्वी उपचारांनंतर ते रविवारी दुपारी सुखरूप घरी परतले.

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील हे सध्या वयपरत्वे आलेल्या आजारपणामुळे रुईकर कॉलनीतील घरीच उपचार घेत आहेत. गेली दीड वर्ष कुठेही गेलेले नाहीत. दहा दिवसांपूर्वी त्यांना छातीत धाप व खोकला जाणवू लागल्याने त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली असता, ती पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर तातडीने उपचार केले. त्यांनी नेहमीप्रमाणे उपचारालाही उत्तम प्रतिसाद दिला. दहा दिवसांच्या उपचारानंतर ते घरी परत आले.

आज लग्नाचा हिरक महोत्सव
सर आणि माई यांच्या लग्नाला आज सोमवारी १७ मे रोजी ६१ वर्षे होत आहेत. या उभयतांनी कधीही वाढदिवस साजरा केला नाही; पण ते आजारातून बरे होऊन घरी आले आणि लग्नाचा वाढदिवस असा योगायोग जुळून आला आहे.

Web Title: Coronavirus: N. D. Patil defeats Corona; 92 years of response to treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.