CoronaVirus News: हे फोटो मोदी सरकारला आयुष्यभर छळतील; काँग्रेस नेते सुरजेवाला यांचा थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 03:58 PM2021-04-28T15:58:56+5:302021-04-28T15:59:23+5:30

CoronaVirus News: देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूंमध्ये मोठी वाढ; स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वेटिंग

CoronaVirus News congress leader randeep singh surjewala slams modi government over corona death | CoronaVirus News: हे फोटो मोदी सरकारला आयुष्यभर छळतील; काँग्रेस नेते सुरजेवाला यांचा थेट निशाणा

CoronaVirus News: हे फोटो मोदी सरकारला आयुष्यभर छळतील; काँग्रेस नेते सुरजेवाला यांचा थेट निशाणा

Next

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदा एका दिवसात १ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर अवघ्या अडीच आठवड्यांत हा आकडा ३ लाखांच्या पुढे गेला. गेल्या ६ दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. मृतांच्या संख्येतही दररोज वाढ होत आहे. त्यामुळे स्मशानभूमी, कब्रस्तानांमध्ये अक्षरश: रांगा लागल्या आहेत. देशातील काही महत्त्वाच्या शहरांमधील स्मशानभूमी २४ तास सुरू आहेत. यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
 
दिल्लीत अंत्यसंस्कारासाठी २० तासांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचं वृत्त सुरजेवाला यांनी ट्विट केलं आहे. 'हे मानवतेच्या विरोधात आहे. हा गुन्हा आहे. अंत्यसंस्कारासाठी लागलेल्या या रांगा अहंकारी शासक दगडाच्या काळजाचे असल्याचा हा पुरावा आहे. आपल्याच लोकांच्या मृतदेहांचा पाया रचून सरकार मजबूत होऊ शकत नाही. या घटना आणि हे फोटो मोदी सरकारचा आयुष्यभर पिच्छा पुरवतील, अशी सुरजेवालांनी केली आहे.



आंधळ्या यंत्रणेला सत्य दाखवा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून लोकांनी एकमेकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. या आंधळ्या यंत्रणेला सत्य दाखवलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. एकमेकांना मदत करताना सामान्य लोक दिसत आहेत. यातून कोणाचं मन जिंकण्यासाठी हाताला स्पर्श करण्याची गरज नसल्याचं दिसून येतं. मदतीचा हात असाच देत राहा आणि या आंधळ्या यंत्रणेला सत्य दाखवत राहा, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.

Web Title: CoronaVirus News congress leader randeep singh surjewala slams modi government over corona death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.