Corona Vaccine : "दुर्दैवाने मोदींनी उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे आधीच अनेकांना गमवावा लागला जीव"; ममता बॅनर्जींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 09:06 AM2021-06-08T09:06:47+5:302021-06-08T09:16:04+5:30

Mamata Banerjee And Narendra Modi Over Corona Vaccine : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

CoronaVirus News west bengal cm mamata banerjee reacts on pm modi new vaccination policy | Corona Vaccine : "दुर्दैवाने मोदींनी उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे आधीच अनेकांना गमवावा लागला जीव"; ममता बॅनर्जींचा घणाघात

Corona Vaccine : "दुर्दैवाने मोदींनी उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे आधीच अनेकांना गमवावा लागला जीव"; ममता बॅनर्जींचा घणाघात

Next

नवी दिल्ली : येत्या आंतराष्ट्रीय योग दिनापासून (२१ जून) केंद्र सरकार १८ वर्षांवरील सर्वांनाच कोरोनावरील लस (Corona Vaccine) मोफत देणार आहे. यापुढे ७५ टक्के लसखरेदी केंद्र सरकारच करेल. त्यामुळे राज्यांना लस खरेदीसाठी खर्च करावा लागणार नाही, अशी महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संवादात केली. लसीकरणात सध्या येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सुरुवातीच्या धोरणाप्रमाणेच यापुढे केंद्र सरकारकडूनच मोफत लस दिली जाईल. दोन आठवड्यात याबाबत मार्गदर्शक सूचना तयार केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी यांनी (Narendra Modi) घेतलेल्या या निर्णयानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"दुर्दैवाने पंतप्रधानांनी उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे आधीच अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे" असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी निशाणा साधला आहे. तसेच मोदींना पत्र लिहून सर्वांना मोफत लस देण्याची प्रलंबित मागणी मांडली होती. यासाठी त्यांना चार महिने लागले असं देखील म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. "फेब्रुवारी २०२१ मध्ये आणि त्यानंतरही अनेकदा मी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून सर्वांना मोफत लस देण्याची प्रलंबित मागणी मांडली होती. यासाठी त्यांना चार महिने लागले आणि तेदेखील दबाव आल्यानंतर…अखेर त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं असून आम्ही कित्येक दिवसांपासून करत असलेल्या मागणीची अमलबजावणी होत आहे" असं ममता यांनी म्हटलं आहे. 

"महामारीच्या सुरुवातीलाच देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यायला हवं होतं. दुर्दैवाने पंतप्रधानांनी उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे आधीच अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावेळी लोकांवर लक्ष केंद्रीत करत लसीकरणाच्या उत्तम व्यवस्थेची अपेक्षा करत आहोत, प्रचाराची नाही" असं ट्विट करत ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असतानाच तसेच लसीकरणातील अनेक अडचणी समोर आल्याने पंतप्रधान या संवादात नेमके काय बोलणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले होते. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, गेल्या १०० वर्षांतील ही सर्वात मोठी महामारी आहे. आधुनिक जगानेही अशी महामारी पाहिलेली नाही. या महामारीत अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले. अशा सर्वांच्या दु:खात मी सामील आहे. 

या काळात आपण कोविड उपचार केंद्र सुरु करणे, आयसीयू बेड वाढवणे, टेस्टिंगसाठी लॅब उभारणे अशा अनेक आघाड्यांवर काम केले. यातून आरोग्य सेवा क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणखी बळकट केल्या. ऑक्सिजनची मागणी या काळात मोठ्या प्रमाणात वाढली. रुग्णाला योग्य उपचार मिळावे यासाठी देशाने जगभरातून ऑक्सिजनसह महत्त्वाची औषधे मागवली. युद्धपातळीवर विशेष ट्रेन तसेच विमाने चालवून ही सामग्री देशभर पोहचवली, असेही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी २१ जूनपासून सगळ्यांना मोफत लस देण्याची घोषणा केल्यानंतर विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. 

Web Title: CoronaVirus News west bengal cm mamata banerjee reacts on pm modi new vaccination policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.