"मला कोरोनाबाधित करून ठार मारण्याचा नितीश कुमारांचा डाव’’, माजी खासदाराचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 04:58 PM2021-05-11T16:58:04+5:302021-05-11T17:00:10+5:30

Bihar Politics News : अटकेच्या कारवाईनंतर पप्पू यादव यांनी ट्वीट करून  नितीश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

Coronavirus: "Nitish Kumar's plot to kill me by coronavirus", serious allegations by former MP Pappu Yadav | "मला कोरोनाबाधित करून ठार मारण्याचा नितीश कुमारांचा डाव’’, माजी खासदाराचा गंभीर आरोप

"मला कोरोनाबाधित करून ठार मारण्याचा नितीश कुमारांचा डाव’’, माजी खासदाराचा गंभीर आरोप

Next

पाटणा - देशातील अन्य भागांप्रमाणेच बिहारमध्येही कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. मात्र कोरानाच्या वाढत्या संसर्गादरम्यान, राज्यात राजकारणालाही ऊत आला आहे. (Bihar Politics News) बिहारमधील जनअधिकार पार्टीचे प्रमुख माजी खासदार पप्पू यादव यांना कोरोनाकाळात लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. (Pappu Yadav) त्यानंतर आता अटकेच्या कारवाईनंतर पप्पू यादव यांनी ट्वीट करून  नितीश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ("Nitish Kumar's plot to kill me by coronavirus", serious allegations by former MP Pappu Yadav )

या ट्विटमध्ये पप्पू यादव म्हणाले की, नितीश कुमारजी नमस्कार, धैर्याची परीक्षा घेऊ नका. अन्यथा जनता व्यवस्था आपल्या हाती घेईल आणि तुमचे प्रशासन लॉकडाऊनबाबतचे सर्व प्रोटोकॉल विसरून जाईल. माझ्यावर महिनाभरापूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. तरीही मी माझे प्राण पणाला लावून लोकांचे आयुष्य वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र तुम्ही मला कोरोना पॉझिटिव्ह करून मारू इच्छित आहात. 

दरम्यान, पप्पू यादव यांनी अजून एक ट्विट  केले आहे. त्यात ते म्हणतात की, सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी केली पाहिजे. मात्र ते पप्पू यादवविरोधात लढत आहेत. आमच्यासोबत सेवेमध्ये, मदतीमध्ये स्पर्धा करा. गुन्ह्यात अडकवून, तुरुंगात पाठवण्याच्या कारस्थानामध्ये वेळ वाया का घालवत आहात, असा टोला त्यांनी लगावला आहे. 

दरम्यान, पप्पू यादव यांच्या समर्थनार्थ बिहार आणि देशातील अनेक मोठ्या नेत्यांनी प्रतिक्रिया देत नितीश कुमार सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, विरोधक नाहीत तर एनडीएमधील सहकारीसुद्धा या निर्णयावर टीका करत आहेत. तसेच पप्पू यादव यांच्या समर्थनार्थ राष्ट्रीय जनता दलाचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले असून, त्यांनी राजीव प्रताप रुढी यांच्या अटकेची मागणी केली आहे. 

Web Title: Coronavirus: "Nitish Kumar's plot to kill me by coronavirus", serious allegations by former MP Pappu Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.