coronavirus: "कोरोनाकाळात महाराष्ट्रात सर्वोत्तम काम, बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले पण…”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 11:00 AM2021-04-29T11:00:33+5:302021-04-29T11:08:20+5:30

Sanjay Raut Criticize Central Government : कोरोनामुळे देशातील परिस्थिती  (coronavirus in India) दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

coronavirus: Sanjay Raut Says,"The best work in Maharashtra during the Coronavir era, there were many attempts to discredit but.." | coronavirus: "कोरोनाकाळात महाराष्ट्रात सर्वोत्तम काम, बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले पण…”

coronavirus: "कोरोनाकाळात महाराष्ट्रात सर्वोत्तम काम, बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले पण…”

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र कोरोनाकाळात महाराष्ट्रामध्ये उत्तम काम होत आहेउद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ज्या पद्धतीनं संकटाशी सामना करतोय,  त्याची सर्वांनाच दखल घ्यावी लागेलकोरोनाच्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात यावे

मुंबई - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या फैलावामुळे देशातील परिस्थिती  (coronavirus in India)दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. (Sanjay Raut Criticize Central Government) कोरोनाकाळात महाराष्ट्राला बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले. मात्र कोरोनाकाळात सर्वोतम काम महाराष्ट्रातच होत आहे. त्यामुळे आता देशातही महाराष्ट्र मॉडेलप्रमाणेच काम करावे लागेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. (Shiv Sena Leader Sanjay Raut Says,"The best work in Maharashtra during the Coronavir era, there were many attempts to discredit but..")

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, एकंदरीत परिस्थिती पाहता देशाला महाराष्ट्र मॉडेलप्रमाणे काम करावे लागेल. गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र कोरोनाकाळात महाराष्ट्रामध्ये उत्तम काम होत आहे. आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ज्या पद्धतीनं संकटाशी सामना करतोय,  त्याची सर्वांनाच दखल घ्यावी लागेल. 

कोरोनाच्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली. ते म्हणाले की, देशातील आजची परिस्थिती पाहता हे राष्ट्रीय संकटच आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे, चर्चेमध्ये कोरोनाच्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची सातत्याने मागणी करत आहेत. ही परिस्थिती राष्ट्रीय आपत्ती असल्याचे जगानेही मान्य केले आहे. त्यामुळे आता या कोरोनाच्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आले पाहिजे. 

 दरम्यान, कोरोनाविरोधातील लसीच्या जाणवत असलेल्या तुटवड्याबाबत भाष्य करताना संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारने जर केंद्राकडे मागणी केली असेल तर केंद्राने तिची पूर्तता केली पाहिजे, असे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोनाबाधिकांचा आकडा बऱ्यापैकी स्थिरावला आहे. काल राज्यात कोरोनाच्या ६३ हजार ३०९ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर दिवसभरात ६१ हजार १८१ जणांनी कोरोनावर मात केली होती. राज्यात सध्या कोरोनाचे ६ लाख ७३ हजार ४८१ अॅक्टिव रुग्ण आहेत.  

Web Title: coronavirus: Sanjay Raut Says,"The best work in Maharashtra during the Coronavir era, there were many attempts to discredit but.."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.