…मग बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं लक्ष कुठं आहे?; पंकजा मुंडेंचा मंत्री धनंजय मुंडेवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 11:24 AM2021-04-16T11:24:53+5:302021-04-16T11:29:19+5:30

बीड जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

Coronavirus vaccine: BJP Pankaja Munde letter to Rajesh Tope Targte on Minister Dhananjay Munde | …मग बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं लक्ष कुठं आहे?; पंकजा मुंडेंचा मंत्री धनंजय मुंडेवर निशाणा

…मग बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचं लक्ष कुठं आहे?; पंकजा मुंडेंचा मंत्री धनंजय मुंडेवर निशाणा

Next
ठळक मुद्देकोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहेआरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यात ७२९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहेजातीने लक्ष घालावे आणि रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत.

मुंबई -  राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानं परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यातच कोरोना लसीचा अभाव असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण कार्यक्रम ठप्प झालेत. या संपूर्ण परिस्थितीमुळे विरोधकांनी सत्ताधारी ठाकरे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आरोगयमंत्री राजेश टोपेंना पत्र लिहून अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. (BJP Pankaja Munde Letter to Health Minister Rajesh Tope over Demand for Corona Vaccine)

पंकजा मुंडे यांनी पत्रात म्हटलंय की, बीड जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यात ७२९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या ३४ हजार ९८९ इतकी आहे त्यातील ३० हजार ४७८ जण बरे होऊन घरी परतले आहेत. एकीकडे आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीनं रुग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. एकूणच या प्रकाराने रुग्णसंख्या वाढीत भर पडत आहे असं त्यांनी सांगितले.

त्यामुळे जातीने लक्ष घालावे आणि रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत. महाराष्ट्र राज्य सरकारला आलेल्या २ लाख लसींपैकी बीडला इतर जिल्ह्याच्या तुलनेत केवळ २० लसी मिळाल्या आहेत ही अतिशय खेदजनक बाब आहे. याकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून पुरेशा लसी उपलब्ध करून द्यावेत आणि तशी व्यवस्था करण्यासाठी संबधित यंत्रणेला सूचित करावे अशी मागणी पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे.

महाराष्ट्राची कामगिरी सरसच

उपलब्ध आकडेवारीनुसार, भाजपशासित राज्यांमध्येही कमी लसीकरण झाल्याचे दिसून आले आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, तसेच पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये लसींचा गंभीर तुटवडा दिसून आला. आठवडाभरापूर्वीच लसींची निर्यात थांबविल्यानंतरही लसींचा तुटवडा कशामुळे निर्माण होत आहे, या प्रश्नाने प्रशासनाला भंडावून सोडले आहे. अशा स्थितीत महाराष्ट्राने १४ एप्रिलला लसीकरणात इतर तीन दिवसाच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे.

Read in English

Web Title: Coronavirus vaccine: BJP Pankaja Munde letter to Rajesh Tope Targte on Minister Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.