coronavirus: "महाराष्ट्राची मदत रोखणारे झारीतले राजकीय शुक्राचार्य कोण?’’, संजय राऊत यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 10:58 AM2021-04-22T10:58:27+5:302021-04-22T11:10:18+5:30
coronavirus: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींनी ऑक्सिजन आणि रेमडेसिविर कमी पडणार नाही, असे भाषणात सांगितले होते. मात्र महाराष्ट्रात ते कमी का पडताहेत.
मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येवरील उपचारांसाठी पुरेसा ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा होत नाही आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींनी ऑक्सिजन आणि रेमडेसिविर कमी पडणार नाही, असे भाषणात सांगितले होते. मात्र महाराष्ट्रात ते कमी का पडताहेत. पंतप्रधान आणि केंद्र सरकारच्या मनात नसेलही. मग कुणी झारीतले राजकीय शुक्राचार्य आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. (Sanjay Raut Criticize BJP & Central Government)
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राला जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरवाव्यात, अशी आमची मागणी आहे. पंतप्रधानांचं परवाचं भाषण ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं की, ऑक्सिजन, रेमडेसिवीर कमी पडणार नाही. मग महाराष्ट्राला का कमी पाडल्या जातायत. हा प्रश्न निर्माण होतोय. मग ही टंचाई महाराष्ट्रात का निर्माण होतेय, हा प्रश्न पडतोय. पंतप्रधान आणि केंद्र सरकारच्या मनात नसेलही. मग कुणी झारीतले राजकीय शुक्राचार्य आहेत का? जे महाराष्ट्राशी वैर घेऊन महाराष्ट्राच्या लोकांच्या जीवाशी खेळताहेत. संकटाच्या प्रसंगी कुणी वैर घेऊन राजकारण करू नये. राज्याचे आरोग्यमंत्री केंद्राशी संवाद साधून प्रश्न सोडवतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशासंदर्भात भूमिका असू शकते. पण शेवटी त्यांनी राज्याराज्यातील परिस्थितीनुसार निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा असे सांगितले. त्यानुसार राज्यात निर्बंध अधिक कडक करण्याचे आदेश आलेले आहे. सरकारमधील काही मंत्र्यांनी कडक निर्बंधांऐवजी लॉकडाऊन लावा, अशी मागणी केली आहे. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊनला पर्याय नाही, हे जागतिक आरोग्य संघटनेनेचे सूत्र आहे, असे विधानही संजय राऊत यांनी यावेळी केले.
देशातील तीन लाखांची जी संख्या आहे ती चाचणी केलेल्यांची आहे. मात्र देशात काही अशी राज्ये आहेत जिथे चाचण्या होत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात रुग्णसंख्या अधिक आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला. दरम्यान,
गुजरातमधील भाजपाच्या कार्यालयात रेमडेसिविर मोफत मिळत आहे. वृत्तपत्रात जाहीराती येताहेत. रेमडेसिविर एकाच राजकीय पक्षाला मिळताहेत. मात्र महाराष्ट्रासारख्या राज्याकडे रेमडेसिविर येत नाही, ही बाब गंभीर आहे. हायकोर्टाने हस्तक्षेप केलाय. पण त्याने काय होणार आहे, असा सवालही त्यांनी विचारला. मात्र महाराष्ट्रात नागूपर हायकोर्टाने राज्य सरकारला रेमडेसिविरवरून फटकारले असता संजय राऊत यांनी
दरम्यान, केंद्र सरकारकडून इकडून तिकडून पैसा गोळा करून तो बंगालमध्ये खर्च केला जातोय. केंद्र सरकारने राज्य सरकारचे देणे असलेला पैसा लवकर द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. तसेच अमित शाहा यांनी महाराष्ट्रातील सरकार आपल्या ओझ्याने पडेल अशा केलेल्या विधानाचाही समाचार घेताना सरकारचे ओझे वाढल्यावर अमित शाहा यांना कळवू, असा टोलाही त्यांनी लगावला.