पत्रव्यवहार नाराजी नव्हे, तो संवादाचा एक भाग - बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 02:14 AM2020-12-20T02:14:17+5:302020-12-20T02:14:51+5:30
Balasaheb Thorat : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद असतो. त्यात काही गोष्टी लिखित स्वरूपात द्याव्यात, असे वाटल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत पत्रव्यवहार केला.
संगमनेर : महाविकास आघाडी स्थापन करताना सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवण्यात आला. गरीब
आणि मागासवर्गीय यावर अधिक
लक्ष केंद्रित करणे हा उद्देश आम्ही ठेवला आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद असतो. त्यात काही गोष्टी लिखित स्वरूपात द्याव्यात, असे वाटल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत पत्रव्यवहार केला. यात कोणाचीही नाराजी नसून, तो संवादाचा एक भाग आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
थोरात म्हणाले, किमान समान कार्यक्रम राबविताना अर्थव्यवस्थेच्या अनेक अडचणी निर्माण झाल्याने काही गोष्टी आम्ही करू शकलो नाही. मात्र, आमचा प्रयत्न सातत्याने सामान्य माणसांचे जीवनमान उंचावण्याचा राहील. ग्रामपंचायतीची निवडणूक ही गावपातळीवरची असल्याने प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याची जबाबदारी असून तसा अधिकारही आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्या पाहिजेत, असा आमचा प्रयत्न आहे.