Parambir Singh: 'अनिल देशमुखांची वसुली देशाने पाहिली';100 कोटींच्या लेटर बॉम्बमुळे राज्यसभा, लोकसभेत गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 12:46 PM2021-03-22T12:46:42+5:302021-03-22T12:51:34+5:30

Bjp Target Maharashtra Government on Parambir Singh's 100 crore allegation on Anil Deshmukh: हमंत्री अनिल देशमुख ज्या पक्षाचे आहेत त्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सदस्य असलेल्या राज्यसभेत मोठा गदारोळ उडाला असून राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. 

'The country saw Anil Deshmukh's recovery'; Rajya Sabha, Lok Sabha chaos due to parambir singh letter bomb | Parambir Singh: 'अनिल देशमुखांची वसुली देशाने पाहिली';100 कोटींच्या लेटर बॉम्बमुळे राज्यसभा, लोकसभेत गोंधळ

Parambir Singh: 'अनिल देशमुखांची वसुली देशाने पाहिली';100 कोटींच्या लेटर बॉम्बमुळे राज्यसभा, लोकसभेत गोंधळ

Next

100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या लेटर बॉम्बमुळे महाराष्ट्रात उठलेले वादळ आता देशाच्या संसदेत घोंघावू लागले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) ज्या पक्षाचे आहेत त्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) सदस्य असलेल्या राज्यसभेत (Rajya sabha) मोठा गदारोळ उडाला असून राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. 

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर(Prakash Javdekar) यांनी राज्यसभेत तर भाजपाचे खासदार राकेश सिंह यांनी लोकसभेत (Loksabha) हा मुद्दा उचलला आहे. जावडेकर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री वसुली करतात हे साऱ्या देशाने पाहिल्याचा आरोप केला आहे. यामुळे राज्यसभेत गदारोळ उठल्याने राज्यसभेच्या सभापतींनी हे काहीही रेकॉर्डवर घेतले जाणार नसल्याचे सांगितले. 




राज्यसभेतच नाही तर लोकसभेतही राकेश सिंह यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackreay) यांनी लगेचच राजीनामा द्यावा, तसेच केंद्रीय तपास संस्थांकडून या प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे.  एखाद्या एपीआयच्या समर्थनात मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्याच एपीआयला म्हणजेच सचिन वाझेला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य दिले होते. 




या साऱ्या गदारोळावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार यांनी महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी मोठ्या काळापासून प्रयत्न सुरु आहेत. परमबीर सिंगांविरोधात काही आरोप आहेत, त्याची चौकशी होत असल्याचे सांगितले. 


खासदार नवनीत राणा यांनीदेखील मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. निलंबित झालेल्या पोलिसाला कोणत्या आधारे पुन्हा सेवेत घेतले? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सचिन वाझेला पोलीस दलात घेण्याची विनंती केली होती. फडणवीसांनी ती नाकारली. जेव्हा ठाकरे सरकार आले तेव्हा त्यांनी वाझेंना परत घेतल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. 

Web Title: 'The country saw Anil Deshmukh's recovery'; Rajya Sabha, Lok Sabha chaos due to parambir singh letter bomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.