“कोरोनापेक्षा देश धार्मिक कट्टरता अन् प्रखर राष्ट्रवादाचा शिकार”; माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींचा निशाणा
By प्रविण मरगळे | Published: November 21, 2020 10:35 AM2020-11-21T10:35:45+5:302020-11-21T10:37:34+5:30
Former Vice President Hamid Ansari News: कोविड हा एक अतिशय वाईट साथीचा रोग आहे, परंतु त्याआधी आपला समाज धार्मिक कट्टरता आणि प्रखर राष्ट्रवादाच्या दोन साथीच्या आजारांना बळी पडला आहे
नवी दिल्ली – आज देश अशा विचारसरणींमुळे धोक्यात आला आहे जो 'आम्ही आणि ते' या काल्पनिक गटाच्या आधारे देशाचं विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना विषाणूच्या संकटापूर्वी भारतीय समाज दोन अन्य महामारीचा शिकार झाला आहे, यात “धार्मिक कट्टरता अन् प्रखर राष्ट्रवाद" यांचा समावेश आहे. तर या दोन्हींच्या तुलनेत देशप्रेम आणि सकारात्मक भावना ही सैन्य व सांस्कृतिकदृष्ट्या सुरक्षात्मक आहे असं माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी शुक्रवारी सांगितले
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्या 'द बॅटल ऑफ बेलॉन्गिंग' या नवीन पुस्तकाच्या डिजिटल प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या मते, चार वर्षांच्या अल्पावधीतच, भारत उदारमतवादी राष्ट्रवादाच्या मूलभूत दृष्टीकोनातून सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नवीन राजकीय दृष्टीकडे वाटचाल करत आहे. जी सार्वजनिक क्षेत्रात दृढपणे कार्यरत आहे. कोविड हा एक अतिशय वाईट साथीचा रोग आहे, परंतु त्याआधी आपला समाज धार्मिक कट्टरता आणि प्रखर राष्ट्रवादाच्या दोन साथीच्या आजारांना बळी पडला आहे.” धार्मिक कट्टरपणा आणि कट्टरपंथी राष्ट्रवादाच्या तुलनेत. देशप्रेम ही अधिक सकारात्मक संकल्पना आहे असं हमीद अन्सारी म्हणाले.
Thanks so much Hamid Ansari Sahib, @FarooqAbdullah_ Sahib, @PavanK_Varma, @MakrandParanspe, @DavidDavidar, @aprakuchhal & KaranThapar for gracing the @FoundationPK launch of #TheBattleOfBelonging & attracting an audience of 800! pic.twitter.com/7XuJZNTaDq
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) November 20, 2020
या पुस्तकाच्या प्रकाशन दरम्यान चर्चेत भाग घेत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला म्हणाले की, "१९४७ मध्ये आम्हाला पाकिस्तानबरोबर जाण्याची संधी होती, परंतु माझ्या वडिलांना आणि इतरांना असं वाटलं की, दोन राष्ट्रांचं तत्त्व आमच्यासाठी चांगले नाही. सध्याचं सरकार ज्यादृष्टीने देशाकडे पाहत आहे, त्याला कधीही स्वीकारणार नाही असं फारूक अब्दुलांनी सांगितले.