कर्नाटकमध्ये येडियुरप्पांची खुर्ची पुन्हा डळमळीत? तर्कवितर्कांदरम्यान काल रात्री झाली पाच मंत्र्यांची बैठक

By बाळकृष्ण परब | Published: September 23, 2020 11:40 AM2020-09-23T11:40:25+5:302020-09-23T11:42:38+5:30

कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा राजकीय नाट्यास सुरुवात झाल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

Crisis on Karnataka CM Yeddyurappa's chair? Amid speculation, a meeting of five ministers took place last night in Bengaluru | कर्नाटकमध्ये येडियुरप्पांची खुर्ची पुन्हा डळमळीत? तर्कवितर्कांदरम्यान काल रात्री झाली पाच मंत्र्यांची बैठक

कर्नाटकमध्ये येडियुरप्पांची खुर्ची पुन्हा डळमळीत? तर्कवितर्कांदरम्यान काल रात्री झाली पाच मंत्र्यांची बैठक

Next
ठळक मुद्देपुढच्या काही दिवसांमध्ये येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात येणार असल्याची चर्चा येडियुरप्पांबाबत काही आमदार आणि मंत्र्यांमध्ये असलेली नाराजी आणि वाढते वय हे त्यांना हटवण्यामागचं कारण ठरेल भाजपाकडून या वृत्तांचे खंडण करण्यात आले आहे

बंगळुरू - एकीकडे कोरोनाच्या वाढत्या फैलावाने कर्नाटक सरकार त्रस्त झाले असतानाचा दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा राजकीय नाट्यास सुरुवात झाल्याचे संकेत मिळू लागले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याविरोधात आता पक्षातूनच कारवायांना सुरुवात झाली असून, पुढच्या काही दिवसांमध्ये येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र भाजपाकडून या वृत्तांचे खंडण करण्यात आले आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावरून काल रात्री बंगळुरूमध्ये कर्नाटक सरकारमधील पाच मंत्र्यांमध्ये बैठक झाल्याचे वृत्त आहे. येडियुरप्पा सरकारमधील मंत्री सुधारक यांच्या घरी झालेल्या बैठकीत चार अन्य मंत्री सहभागी झाले होते. त्यामध्ये येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आल्यास त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबत चर्चा झाली.

काल रात्री झालेल्या या बैठकीला सुधाकर यांच्यासोबत बी.एस.पाटील, आनंद सिंह, सोमशेखर, नागेश हे उपस्थित होते. कर्नाटकमधील आधीचे सरकार कोसळल्यानंतर ही नेतेमंडळी येडियुरप्पा यांच्यावर विश्वास ठेवून भाजपामध्ये दाखल झाली होती. त्यानंतर त्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. दरम्यान, आता जर येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून निरोप देण्यात आला तर भविष्यात आपल्यावरही संकट येऊ शकते, अशी भीती या मंत्र्यांना आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती काय असावी याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

कर्नाटकमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी बी.एस. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात येणार असल्याचे वृत्त दिले होते. त्यानंतर भाजपाला याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले होते. भाजपाचे प्रवक्ते गणेस कर्णिक यांनी सांगितले की, कर्नाटकमध्ये नेतृत्वबदल होणार असल्याच्या बातम्याना निराधार आहेत. भाजपाकडून या वृत्तांचे स्पष्टपणे खंडन करण्यात येत आहे.

येडियुरप्पा यांना डिसेंबर महिन्यापर्यंत मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात येणार असल्याची चर्चा कर्नाटकमधील राजकीय वर्तुळात सुरू होती. येडियुरप्पांबाबत काही आमदार आणि मंत्र्यांमध्ये असलेली नाराजी आणि वाढते वय हे त्यांना हटवण्यामागचं कारण ठरेल, असे सांगण्यात येत होतं. दरम्यान, आताच नेतृत्व बदल करून पुढील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्याचा भाजपाचा विचार असल्याचे सांगण्यात येत होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या
श्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता

आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे  

Web Title: Crisis on Karnataka CM Yeddyurappa's chair? Amid speculation, a meeting of five ministers took place last night in Bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.