आदित्य ठाकरेंवर खालच्या शब्दात टीका, नितेश राणे म्हणाले- माझे शब्द मागे घेतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 02:19 PM2021-07-07T14:19:54+5:302021-07-07T14:23:56+5:30

Nitesh Rane Controvercial Statement on Aditya Thackeray: शिवसेनेकडून जोरदार विरोध झाल्यानंतर नितेश राणेंनी शब्द परत घेतले

Criticism of Aditya Thackeray, Nitesh Rane take his statement back | आदित्य ठाकरेंवर खालच्या शब्दात टीका, नितेश राणे म्हणाले- माझे शब्द मागे घेतो...

आदित्य ठाकरेंवर खालच्या शब्दात टीका, नितेश राणे म्हणाले- माझे शब्द मागे घेतो...

googlenewsNext
ठळक मुद्देभाजप आमदारांची विधानसभेच्या पायऱ्यांवर भरवली प्रतिविधानसभा नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांचा मुंबईत प्रचंड गोंधळ राडा

मुंबई:भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत बोलताना खालच्या शब्दात टीका केली होती. काल(दि.7) विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपकडून भरवण्यात आलेल्या प्रतिविधानसभेत 'आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का ? त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल', अशी खालच्या पातळीवरची टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी मुंबईत प्रचंड गोंधळ घातला. यानंतर आता नितेश राणेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 'माझे शब्द मागे घेतो’ असे ट्विट राणेंनी केल आहे. 

काल आणि परवा राज्याचे पावसाळी अधिवेशन पार पडले. अतिशय वादग्रस्त ठरलेल्या या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. त्या कारवाईचा निषेध म्हणून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर प्रतिविधानसभा भरवली होती. इथेच भाषण करताना नितेश राणेंनीनी आदित्य ठाकरेंवर ही घणाघाती टीका केली.

काय म्हणाले नितेश राणे?
यावेळी भाषण करताना नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे घराणे काढले. आदित्य ठाकरे यांचेच वंशज आहेत का ? यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असे आक्षेपार्ह वक्तव्य नितेश राणेंनीनी केले. नितेश यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी मुंबईत प्रचंड राडा केला. नितेश राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा देखील जाळण्यात आला. या सर्व गोंधळानंतर नितेश राणे यांना उपरती झाली आणि  त्यांनी आज त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. राणेंनी ट्विट केले की, 'विधानभवनाबाहेर माझ्या कालच्या भाषणामध्ये मी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख केला होता. तो अनेकांनी चुकीच्या पद्धतीने घेतला. त्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर, मी माझे शब्द परत घेतो', असे ट्विट नितेश राणे यांनी केले.
 

Web Title: Criticism of Aditya Thackeray, Nitesh Rane take his statement back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.