'आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, पण आमच्या अंगवार आल्यावर आम्ही सोडत नाही...'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 05:16 PM2021-08-01T17:16:35+5:302021-08-01T17:16:49+5:30
Devendra Fadnavis: भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
मुंबई: भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावप टीकेची झोड उठत आहे. 'वेळ आली तर शिवसेना भवन फोडू', असं वक्तव्य लाड यांनी केलं. या प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'तोडफोड करणं भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. आमच्यासाठी हा विषय संपलाय', असं फडणवीस म्हणाले.
...पण अंगावर आलं तर सोडत नाही
मुंबईत भाजप कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाविषयी बोलताना टोकाचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, 'तोडफोड करणं भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. प्रसाद लाड यांनी आपला व्हिडीओ काढून स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्य़ासाठी हा विषय संपलाय. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आलं तर सोडत नाही,' असा इशारा दिला.
VIDEO: ...वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, भाजपा आमदार प्रसाद लाड यांचं वादग्रस्त विधान pic.twitter.com/5HIlciEbPk
— Lokmat (@MiLOKMAT) July 31, 2021
काय म्हणाले होते प्रसाद लाड ?
"नारायण राणेंना स्वाभीमानचा खूप मोठा गट आज राणेंमुळे भारतीय जनता पक्षात आला आहे. त्यामुळे भाजपाची ताकद निश्चितपणे दुप्पट झाली आहे. पुढच्या वेळी आपण जरा कार्यकर्ते कमीच आणू, कारण आपण आलो की पोलिसच खूप येतात. फक्त त्यांना सांगूयात गणवेशात येऊ नका, म्हणजे आपल्या हॉलमध्ये बसायला त्यांचा उपयोग होईल. एवढी भीती यांना वाटू लागलीय की माहिममध्ये आपण आता आलोय म्हणजे सेना भवन फोडणार की काय असं यांना वाटतं. काही घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू" असं चिथावणीखोर वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होतं.