“MPSC ला स्वायत्तता दिली, म्हणजे स्वैराचार नाही”; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 04:08 PM2021-07-04T16:08:19+5:302021-07-04T16:10:25+5:30

MPSC: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि एमपीएसई यांच्यावर निशाणा साधला.

devendra fadnavis slams thackeray govt over mpsc student suicide in pune | “MPSC ला स्वायत्तता दिली, म्हणजे स्वैराचार नाही”; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

“MPSC ला स्वायत्तता दिली, म्हणजे स्वैराचार नाही”; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

Next
ठळक मुद्देMPSC वरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांनी साधला MPSC वरही निशाणापुण्यातील विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे खळबळ

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यानंतर आता भाजपने सत्ताधारी ठाकरे सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहे. एमपीएससीला स्वातंत्र्य हवंच पण स्वैराचार नको, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि एमपीएसई यांच्यावर निशाणा साधला. (devendra fadnavis slams thackeray govt over mpsc student suicide in pune)

MPSC च्या कार्यप्रणालीचे पुनरावलोकन होण्याची आवश्यकता आहे. मुलाखती होत नाहीत. अत्यंत अपेक्षेने ही सगळी मुले अशा प्रकारच्या परीक्षा देतात आणि दोन-दोन वर्षे मुलाखतच झाली नाही. तर, मग त्यांना ही निराशा येते. आम्ही एमपीएससीला स्वायत्तता दिलेली आहे, पण स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही. एमपीएससीच्या संपूर्ण कारभाराचा पुन्हा आढावा घेऊन याला अधिक आपल्याला कार्यक्षम करता येईल याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

“अशी दडपशाही करून आघाडी सरकारचं आरक्षण अपयश लोकं कसं विसरतील?”

राज्य सरकारने दुर्लक्ष करू नये

MPSC संदर्भात राज्य सरकारने दुर्लक्ष करु नये. स्वायत्त संस्थेला पूर्ण स्वातंत्र्याने काम करु द्यायला हवे. परीक्षा पास झाल्यानंतर दोन दोन वर्षे मुलाखती होत नाहीत. पोस्टिंग मिळत नाही म्हणून झालेल्या आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे, असे सांगत अनेक जागा रिक्त आहेत. परीक्षा उशिरा होतात. अनेक तरुण यामुळे भरडले जात आहे, असे फडणवीस म्हणाले. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस सांगितले की, सरकार पोलीस यांच्यामार्फत लोकांना थांबवू शकेल. पण मनातील खदखद थांबवू शकणार नाही. भोसले समितीने स्पष्ट म्हटले आहे की, मागासवर्गीय आयोग नेमावा लागेल. हा राज्य सरकारचा विषय आहे, केंद्र सरकारचा नाही.

दरम्यान, स्वप्निल लोणकर या MPSC उत्तीर्ण झालेल्या आमच्या भावाचा ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळं जीव गेला त्याबद्दल सर्वज्ञानी संजय राऊत यांच्याकडनं अपेक्षित होते की आपल्या नेहमीच्या पहाटेच्या आरवण्यात काहीतरी दोन शब्द बोलतील नाहीतर नेहमीप्रमाणे केंद्राला तरी दोष देतील. पण हे पुन्हा सिद्ध झाले की ते ‘प्रस्थापितांचे पोपट’आहेत.. स्वप्नील लोणकर या आमच्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली, या शब्दांत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे जोरदार टीका केली आहे. 

 

Web Title: devendra fadnavis slams thackeray govt over mpsc student suicide in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.