DMK हिंदूविरोधी पक्ष, तमिळ भाषेला वाचवायचं असेल तर हिंदुत्व आणलं पाहिजे : तेजस्वी सूर्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 02:14 PM2021-02-22T14:14:29+5:302021-02-22T14:21:06+5:30
Tejasvi Surya In Tamil Nadu : भाजपला प्रत्येक स्थानिक भाषांचा आदर, तमिळ भाषा वाचवायची असल्यास हिंदुत्वाला जिंकावं लागेल, सूर्या यांचं वक्तव्य
रविवारी भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी तामिळनाडूचा दौरा केला. यावेळी त्यांनी द्रविड मुनेत्र कणगम (DMK) वर जोरदार निशाणा साधला. द्रमुक हा पक्ष हिंदू विरोधी असून आपल्याला एनके स्टॅलिन यांच्या पक्षाचा पराभव करायला हवा. भाजपचं असा पक्ष आहे जो भारतातील सर्व भाषांचा सन्मान करतो आणि त्यांना चालनाही देतो असं ते म्हणाले.
"द्रमुक या ठिकाणी अतिशय वाईट आणि धोकादायक विचारधारेचं प्रतिनिधीत्व करते. त्यांची विचारधारा हिंदू विरोधी आहे. प्रत्येक तमिळ व्यक्ती हा हिंदू आहे. ही अशी पवित्र भूमी आहे ज्या ठिकाणी देशातील सर्वाधिक मंदिरं आहेत. तमिळनाडूची इंच न इंच जमिन ही पवित्र आहे. परंतु द्रमुक हा हिंदू विरोधी पक्ष आहे. आपल्याला त्यांचा पराभव करावाच लागेल," असं तेजस्वी सूर्या एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले.
DMK represents a very bad, virulent ideology which is anti-Hindu. Every Tamil is proud Hindu. This is the sacred land that has highest number of temples in country, every inch of Tamil Nadu is sacred, but DMK is anti-Hindu,so we must defeat it: BJP MP Tejasvi Surya in Salem y'day pic.twitter.com/2ls5nLVWdm
— ANI (@ANI) February 21, 2021
"जर आपल्याला तमिळ भाषा वाचवायची असेल तर हिंदुत्वाला जिंकावं लागेल. जर कन्नड भाषा वाचवायची असेल तर हिंदुत्वाला जिंकावं लागेल. भाजप तमिळनाडू आणि तमिळ भाषेच्या आत्म्याचं प्रतिनिधीत्व करते," असंही त्यांनी नमूद केलं. द्रमुकसाठी कुटुंबच पक्ष आहे. परंतु भाजपसाठी पक्ष हा कुटुंब आहे. आपल्याला द्रमुकच्या हिंदू विरोधी विचारधारेला आव्हान द्यावं लागेल. जेव्हा ते सत्तेत असतात तेव्हा ते हिंदू संस्था आणि आस्थेवरहल्ला करतात. परंतु सत्तेतून बाहेर गेल्यावर हिंदू मतं मागत फिरतात. हे चालू देणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. तमिळनाडूतही या वर्षाच्या अखेरिस विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत.