ज्या पक्षावर टीका केली, त्याच पक्षात प्रवेश करताय? यावर एकनाथ खडसे म्हणाले...

By Ravalnath.patil | Published: October 21, 2020 04:01 PM2020-10-21T16:01:12+5:302020-10-21T16:20:44+5:30

BJP Eknath Khadse will Join NCP News: येत्या शुक्रवारी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Do you join the party you criticized? On this Eknath Khadse said ... | ज्या पक्षावर टीका केली, त्याच पक्षात प्रवेश करताय? यावर एकनाथ खडसे म्हणाले...

ज्या पक्षावर टीका केली, त्याच पक्षात प्रवेश करताय? यावर एकनाथ खडसे म्हणाले...

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांनी भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे नेते ज्येष्ठ एकनाथ खडसे यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपाला रामराम ठोकला आहे. आता ते  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत्या शुक्रवारी प्रवेश करणार आहेत. गेल्या अनेक दशकापासून एकनाथ खडसे यांनी भाजपा वाढवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, अलीकडच्या काळात एकनाथ खडसेंना पक्षात डावलले जात असल्याचे दिसून आले होते.

भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पत्रकारांनी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर तुम्ही प्रचंड टीका केली, त्याच पक्षामध्ये, त्यांच्या सरकारमध्ये सहभागी होणार आहात का? असा प्रश्न विचारला. त्यावर "मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांवर कधी टीका केली नाही. मी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारवर टीका केली, त्यावेळी मी राज्याचा विरोधी पक्षनेता होतो," असे उत्तर एकनाथ खडसे यांनी दिले.

देवेंद्र फडणवीसांवर टीका
भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांनी भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. यावेळी "गेल्या 40 वर्षात मी भाजपाचे काम केले. भाजपा जिथे पोहोचली नव्हती, तिथे आम्ही पोहोचवली. काही मिळाले, नाही मिळाले याचे दु:ख नाही, पण देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला," असे एकनाथ खडसे म्हणाले.

'चंद्रकांत पाटलांशिवाय कुणाचाही फोन नाही'
भाजपकडून आपल्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सोडले तर एकाचाही फोन आला नाही, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. मात्र, चंद्रकांत पाटील सुद्धा आपण पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात, तुम्ही पक्षा सोडू नका, एवढंच बोलले, असे एकनाथ खडसे म्हणाले.

Web Title: Do you join the party you criticized? On this Eknath Khadse said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.