Anupam Kher: 'घाबरू नका...येणार तर मोदीच', टीकाकारांना उत्तर द्यायला गेले, अनुपम खेर ट्रोल झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 09:11 AM2021-04-26T09:11:04+5:302021-04-26T09:16:37+5:30
Anupam Kher trolled on Social Media: देशात जेव्हापासून कोरोनाची दुसरी लाट वाढू लागली तेव्हापासून सोशल मीडियावर मोदी सरकारवर टीका सुरु झाली होती. रविवारीदेखील असेच झाले. मात्र, अनुपम खेर यांना रहावले नाही.
देशात कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात तीन लाखांहून अधिक रुग्ण सापडू लागले आहेत. तर दोन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. यामुळे सोशल मीडियावर लोकांनी मोदी सरकारला (PM Narendra Modi Government) धारेवर धरण्यास सुरुवात केली असून टीकेची झोड उठविली आहे. यामध्ये सेलिब्रिटींपासून सामान्य यूजरदेखील टीका करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या समर्थनात आता बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam kher) आले आहेत. त्यांनी एका ट्विटला उत्तर देताना म्हटले, घाबरू नका...येणार तर मोदीच. (Dont worry...ayega to modi hi, Anupam kher slogan in journalist tweet reply.)
देशात जेव्हापासून कोरोनाची दुसरी लाट वाढू लागली तेव्हापासून सोशल मीडियावर मोदी सरकारवर टीका सुरु झाली होती. रविवारीदेखील असेच झाले. मात्र, अनुपम खेर यांना रहावले नाही. त्यांनी मोदींविरोधातील ट्विटला उत्तर दिले. या ट्विटमध्ये सरकारवर टीका करण्यात आली होता. याला उत्तर देताने अनुपम खेर यांनी लिहिले की, आदरणीय, हे आता जास्तच झाले. तुमच्या स्टँडर्डहूनही. कोरोना एक संकट आहे, सर्व जगासाठी. या महामारीचा सामना आम्ही आधी कधीच केला नाही. सरकारवर टीका जरुरुची आहे. पण कोरोना संकटाविरोधात लढण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. तसेही घाबरू नका, येणार तर मोदीच, जय हो.
अनुपम खेर यांच्या पत्नी किरन खेर या भाजपाच्या खासदार आहेत. अनुपम खेर यांनी या आधीदेखील मोदी सरकारची बाजू घेतली आहे. मात्र, आजच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर युजर संतापले आहेत. त्यांनी खेर यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Shameless Anupam Kher lost his brain when he lost his hair. pic.twitter.com/oMzZmBCpIh
— Jai Kisan (@BhaktonkiMaa) April 26, 2021
एकाने तर अनुपम खेर यांना देवाने सद्बुद्धी द्यावी, असे म्हटले आहे. अन्य एका युजरने लिहिले की, अनुपम खेर यांनी आपला खरा रंग दाखविला.
अनुपम खेर यांचे हे ट्विट अभिनेते परेश रावल यांनीदेखील रिट्विट करत तुम्हीदेखील त्या टीकाकारासारखे बनू नका, असा सल्ला दिला आहे. यावरून रावल यांनादेखील ट्रोल व्हावे लागले आहे.
Anupam Kher showing his true colors. #NoVoteTo_EvilModihttps://t.co/UupgVm47MG
— Sukh K. Gill (@SLove4Earth) April 26, 2021