“काळजी करू नका, हे शेतकऱ्यांचे सरकार; नुकसानीची माहिती गोळा करून अभ्यास करत बसणार नाही"

By प्रविण मरगळे | Published: October 19, 2020 11:46 AM2020-10-19T11:46:33+5:302020-10-19T11:49:20+5:30

CM Uddhav Thackeray News: हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, लवकरच मदत जाहीर करू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गावकऱ्यांना सांगितलं आहे. 

"Don't worry, I'm here to reassure you"; CM Uddhav Thackeray interacts with flood victims | “काळजी करू नका, हे शेतकऱ्यांचे सरकार; नुकसानीची माहिती गोळा करून अभ्यास करत बसणार नाही"

“काळजी करू नका, हे शेतकऱ्यांचे सरकार; नुकसानीची माहिती गोळा करून अभ्यास करत बसणार नाही"

googlenewsNext
ठळक मुद्देविरोधी पक्षाने राजकारण करू नये, राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाहीआपत्ती काळात केंद्र आणि राज्य असं काही करू नये, केंद्राकडून राज्याला जे देणं आहे असेल ते केंद्र सरकारने द्यावेमी तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे, तुम्ही एकटे नाही, कोणीही वाऱ्यावर पडलं नाही, आपलं सरकार हे तुमचं सरकार आहे

सोलापूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची पाहणी करण्यासाठी पोहचले आहेत, सांगवी खुर्दच्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद साधला, यावेळी तुम्ही एकटे नाही, सरकार तुमच्या पाठिशी आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ग्रामस्थांना दिलासा दिला आहे.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे, तुम्ही एकटे नाही, कोणीही वाऱ्यावर पडलं नाही, आपलं सरकार हे तुमचं सरकार आहे, तुमच्या पाठिशी आहे, तुम्हाला धीर द्यायला आलो आहे, काळजी करू नका, नुकसान भरपाई देऊ पण कोणाचेही जीव जाऊ देऊ नका. सावध राहा, किती नुकसान झालंय याचे पंचनामे सुरु आहे, माहिती गोळा केली जात आहे पण माहिती गोळा करून त्याचा अभ्यास करत बसणार नाही, हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, लवकरच मदत जाहीर करू असं त्यांनी  गावकऱ्यांना सांगितलं आहे. 

तसेच विरोधी पक्षाने राजकारण करू नये, राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही, आपत्ती काळात केंद्र आणि राज्य असं काही करू नये, केंद्राकडून राज्याला जे देणं आहे असेल ते केंद्र सरकारने द्यावे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्याआधीच वाद निर्माण झाला होता, सांगवी खुर्दच्या ग्रामस्थांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बोरी नदीच्या पुलावर या असे सांगितले गेले, पण, पुलावरुन नुकसान भरपाईची पाहणी करणार कसं? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित करत मुख्यमंत्री गावात आले तर ठीक, नाहीतर आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती, मात्र सुरक्षेचे कारण देत प्रशासनाने गावकऱ्यांची समजूत काढली त्यानंतर काही गावकऱ्यांना रस्त्यावर बोलवण्यात आले, या लोकांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला.

राज्य सरकारने जबाबदारी झटकून चालणार नाही

अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिकाचं नुकसान झालं आहे, जनावरांना चाराही उरला नाही, पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर कोणी आलं नाही, १०० टक्के शेतीचं नुकसान झालं आहे. त्यामुळे पंचनामे वैगेरे या भानगडीत न पडता तात्काळ मदत केली पाहिजे, जनावारांना चारा दिला पाहिजे, त्यासाठी राज्य सरकारने पाऊलं उचलावी, अतिवृष्टी झाल्यानंतर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे, परंतु राज्य सरकारने प्राथमिक जबाबदारी ओळखून तात्काळ मदत केली पाहिजे, मागील वर्षी पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर मी १० हजार कोटी तातडीने मदत जाहीर केली, केंद्र सरकारचं पथक येईल, नुकसान भरपाईचा आढावा घेईल, राज्य सरकारने जबाबदारी झटकून चालणार नाही, केंद्र सरकार मदत करणार आहे, पण तोपर्यंत राज्य सरकारने मदत करायला हवी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केली आहे.

तर सोयीस्कर राजकीय भूमिका कोणीच घेऊ नये, मदत कशी मिळते हे सगळ्याच नेत्यांना माहिती आहे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नको, ही त्यांची मागणी आहे. राज्यपालांचे एखादे वाक्य आणि त्यावरील विवाद ही वेळ नाही, राज्यपालांसोबत मनभेद असतील तर यापुढे होतील, पण आता शेतकऱ्यांना काय मदत मिळणार हे पाहणे गरजेचे आहे. शरद पवारांना सरकारला पाठिशी घालावं लागतंय, या सरकारला पाठिशी घालणं एवढचं काम सरकारकडे आहे. राज्य सरकारविरोधात लोकांमध्ये असंतोष आहे. आमचा दौरा घोषित होईपर्यंत कोणताही पालकमंत्री जिल्ह्याकडे फिरकले नव्हते, आम्ही दौरा करायला लागल्यामुळे सगळेजण आता घराबाहेर पडले आहेत असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

 

Web Title: "Don't worry, I'm here to reassure you"; CM Uddhav Thackeray interacts with flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.